Sakal Seminar : जाणून घ्या पदवीनंतरच्या करिअर संधी; ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य सेमिनार

free seminar on career opportunities for graduate students on Tuesday 9 april jalgaon news
free seminar on career opportunities for graduate students on Tuesday 9 april jalgaon newssakal
Updated on

Jalgaon News : चालू वर्षी बीएस्सी ऍग्री व संलग्न शाखा, बीएस्सी हॉर्टीकल्चर, बीबीए, बीए, बीएस्सी केमिस्ट्री, बीकॉम, बीटेक बायोटेक्नॉलॉजी, बीटेक फूड, बीटेक ऍग्री इंजिनिअरिंग, बीई, बीसीए इ.पदवीच्या परिक्षा दिलेल्या किंवा पदवी घेतलेल्या २१ ते २५ वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी पदवीनंतर पुढे कोणते शिक्षण घ्यावे, कोणत्या क्षेत्रात करिअर करावे, याविषयी संभ्रम असतो. (free seminar on career opportunities for graduate students on Tuesday 9 april jalgaon news)

अशावेळी पदवीनंतर केलेल्या पुढील शिक्षणाद्वारे चांगला जॉब मिळावा किंवा एखादा व्यवसाय सुरू करायचे नियोजन असल्यास योग्य मार्गदर्शन मिळणे अत्यंत गरजेचे असते.

हे लक्षात घेऊन कृषी क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या सर्व पदवीधर अर्थात ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांसाठी करिअर संधींविषयी माहिती देणारा विनामूल्य सेमिनार मंगळवारी (ता.९) सकाळ- ॲग्रोवन संलग्न शैक्षणिक संस्था एसआयआयएलसीतर्फे जळगाव एमआयडीसीतील सकाळ कार्यालयात आयोजिला आहे.

सकाळ माध्यम समुहाच्या ‘ॲग्रोवन’ या दैनिकामुळे गेल्या १८ वर्षांपासून कृषी क्षेत्रातील विविध नवनवीन संधी आणि तंत्रज्ञानाची माहिती शेतकरी तसेच अन्य वर्गाला मिळत आहे. या दैनिकाच्या माध्यमातून या क्षेत्रातील विविध इंडस्ट्रींसोबत उत्तम जाळे निर्माण झाले आहे. त्यातून इंडस्ट्रीसाठी लागणाऱ्या कुशल मनुष्यबळाची मागणी देखील लक्षात आली.

हे ध्यानात घेऊन सकाळच्या एसआयआयएलसी या शैक्षणिक संस्थेने इंडस्ट्री तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली २१ ते २५ वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी देशातील एकमेव असा अभ्यासक्रम तयार केला आहे. विशेष म्हणजे हा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना इंडस्ट्रीजमध्ये नोकरीच्या विविध संधी उपलब्ध होण्याचा पर्याय उपलब्ध झाला आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

free seminar on career opportunities for graduate students on Tuesday 9 april jalgaon news
MS Dhoni Education: धोनी कितवी शिकलाय माहितेय?

कोणत्याही शाखेचे ग्रॅज्युएट अर्थात पदवीधर विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात. जळगाव आयोजित सेमिनारमध्ये या अभ्यासक्रमाचे स्वरूप, कालावधी, विषय तसेच अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना व्यावसायिकतेच्या तसेच रोजगाराच्या संधी कुठे उपलब्ध होऊ शकतात याचे मार्गदर्शन होईल. सेमिनारमध्ये सहभागी होण्यासाठी नावनोंदणी आवश्यक आहे.

अभ्यासक्रमाची वैशिष्ठ्ये

- देशातील एकमेव १ वर्षाचा सखोल अभ्यासक्रम

- इंडस्ट्रींनी आखलेला अभ्यासक्रम

- इंडस्ट्री तज्ज्ञांकडून अभ्यासक्रमाचे मार्गदर्शन

- सहा महिने इंडस्ट्रींसोबत कामाची संधी

- १०० टक्के प्लेसमेंट रेकॉर्ड

सेमिनार

कधी : मंगळवार, ता.९ मे २०२३

केव्हा : दुपारी ११.३० वाजता

कुठे : सकाळ पेपर्स कार्यालय, सी-३, एमआयडीसी एरिया, टेलिफोन एक्चेंजसमोर, जळगाव

नावनोंदणीसाठी संपर्क : ९८८१०९९७५७

free seminar on career opportunities for graduate students on Tuesday 9 april jalgaon news
Unseasonal Rain Crop Damage : पावणे 4 हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.