Jalgaon News : चौधरी कुटुंबातील तिसऱ्या पिढीकडून जखमी गोविंदांवर मोफत उपचार! ७६ वर्षांची परंपरा आजही कायम

Dr. Awadhoot Chaudhary
Dr. Awadhoot Chaudharyesakal
Updated on

Jalgaon News : श्रीकृष्ण जन्मोत्सवानंतर गुरुवारी (ता. ७) सर्वत्र दहीहंडी उत्सव साजरा होत आहे. जळगाव शहरासह तालूक्यात दहीहंडी फोडताना जखमी होणाऱ्या गोविंदांवर जुने जळगावातील हाडवैद्य असलेले चौधरी कुटूंबीय गेल्या ७६ वर्षापासून मोफत उपचार करत आहेत. (Free treatment for injured Govinda from third generation of Chaudhary family jalgaon news)

जुने जळगाव परिसरातील विठ्ठल पेठ, पांझरापोळ टाकीजवळ हाडवैद्य डॉ. अवधुत चौधरी यांच्या तीन पिढ्या सलग सेवा देत आहेत. गोरगरीब, शेत मजुर, शेतकऱ्यांच्या दुखण्यावर यशस्वी उपचार करणाऱ्या हाडवैद्य नामदेवबाबांचे हे कुटूंब आहे.

दहीहंडी उत्सावात हंडी फोडताना मनोरे कोसळून जखमी होणाऱ्या गोविंदानाही नामदेवबाबांकडे आणले जात असे. त्यांनी आयुष्यभर रुग्णसेवा केली. त्यात जखमी गोविंदांसह कुस्त्यांच्या दंगलीत जखमी होणारे पैलवान, अन्य खेळाडूंवरही ते मोफत उपचार करत असत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Dr. Awadhoot Chaudhary
Krishna Janmashtami : दहीहंडी फोडण्याचा मान यंदाही तरुणींच्या पथकास; जैन फाऊंडेशन व युवाशक्ती फाउंडेशनचा उपक्रम

ही परंपरा फिजीओथेरपीस्ट डॉ. अवधुत चौधरी व आता तिसऱ्या पिढीत त्यांचे पूत्र नितेश व स्वप्नील या दोघांनीही कायम ठेवली आहे. जखमी गोविंदांवर आयुर्वेदीक वनऔषधींच्या माध्यमातून लेपन, शेक लावून उपचार केले जातात.

तसेच, अधुनीक पद्धतीने फिजीओथेरपी देण्यात येते. जळगावसह तालूक्यातील अन्य गावांतून जखमी गोविंदा उपचारासाठी डॉ. चौधरींच्या क्लिनीकला येत असतात. यंदाही त्यांनी उपचाराची पुर्ण तयारी दर्शविली असून, जखमी गोविंदांन मोफत उपचारासाठी घेवुन येण्याबाबतही मंडळांना आवाहन केले आहे.

Dr. Awadhoot Chaudhary
Dombivli Dahi-Handi : न्यायालयाचा ठाकरे गटाला पुन्हा धक्का ; शिंदे गटाला मिळाली परवानगी !

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.