Jalgaon Crime : जन्मठेपेतून जामिनावर सुटला अन् मित्राच्या जिवावर उठला!

Injured Lalit Chaudhary
Injured Lalit Chaudhary esakal
Updated on

जळगाव : शहरातील मध्यवर्ती ठिकाणी शिवतीर्थ मैदानावर भरदिवसा चॉपरने प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली. चंद्रकांत पाटील खून खटल्यात जन्मठेपेच्या शिक्षेत जामिनावर सुटल्यानंतर अवघ्या सोळाव्या दिवशीच लखन दिलीप मराठे याने त्याचा साथीदार ललित गणेश चौधरी (वय २७, रा. ईश्वर कॉलनी) याच्यावर प्राणघातक हल्ला चढवून गंभीर जखमी केले.

जखमी ललित गणेश चौधरी ऊर्फ सोन्या याने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (ता. १०) साडेबाराच्या सुमारास त्याला लखन दिलीप मराठे ऊर्फ बोबड्या (रा. शिवाजीनगर, हुडको) याचा फोन आला. त्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या मागे भेटायला बोलावल्याने ललित चौधरी त्याला भेटायला गेला. (friend deadly attack his friend over money jalgaon crime news)

या वेळी पूर्वीपासूनच ललितचा मित्र सुमीत राजेंद्र विचारे याला लखन मारहाण करीत होता. त्याला ललितने सोडविले. तेव्हा लखनने ललितकडे पैशांची मागणी केली. ‘तू काय करतोय हे सर्व आम्हाला माहिती आहे.

पैसे कुठे आहेत? मी जेलमधून सुटून आलोय. मला पैसे दे,’ असे म्हणत वाद घालायला सुरवात केली. पैसे देण्यास नकार दिल्याने लखनने चॉपर काढून ललित चौधरीवर हल्ला चढविला. एकामागोमाग लखनने ललितवर चार वार केल्याने तो गंभीर जखमी झाला.

अशाही अवस्थेत तो प्रतिकार करत असल्याने मानेवरील वार त्याच्या खांद्यावर लागल्याने थोडक्यात जीव वाचला. घटनास्थळी भांडण आवरून त्याचा मित्र हृतिक याच्यासह सुमीत विचारे यांनी जखमी अवस्थेत ललितला खासगी रुग्णालयात हलविले.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर जिल्‍हापेठ पोलिसांनी धाव घेतली. पोलिस नाईक रुस्तम तडवी यांनी चौकशी केली, मात्र ललित चौधरीवर शस्त्रक्रिया सुरू असल्याने पोलिस चौकशी करून निघून गेले.

Injured Lalit Chaudhary
Jalgaon Crime : विवाहितेला बिहारमध्ये बोलावून अत्याचार करणारा अटकेत

सख्खे मित्र पक्के वैरी!

शहरातील जोशी कॉलनीतील होतकरू तरुण चंद्रकात सुरेश पाटील याचे वडील अंडापावाची गाडी लावतात. त्यांना मारहाण होत असल्याने बचाव करण्यासाठी आलेल्या चंद्रकांतचा १५ मे २०१५ ला खून झाला होता.

या खुनाच्या गुन्ह्यात चेतन सुरेश आळंदे ऊर्फ चिंग्या, लखन दिलीप मराठे, सागर वासुदेव पाटील, सनी ऊर्फ चाळीस वसंत पाटील आणि ललित गणेश चौधरी यांना जिल्‍हा न्यायालयाने २०१९ मध्ये जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती.

त्यात ललित चौधरी व सागर पाटील या दोघांचा तीन वर्षांपूर्वीच (२०१९) जामीन झाला होता. ६ जून २०२२ ला सागरचा कासमवाडी मच्छीबाजारात खून झाला आहे. खुनाच्या गुन्ह्यातील नंबरकारी आणि पक्का मित्र असलेल्या लखन मराठे याने ललित चौधरीवर सोमवारी प्राणघातक हल्ला चढविला.

Injured Lalit Chaudhary
Jalgaon : ‘अमृत टप्पा 1’चे 2 महिन्यांत मिळणार पाणी! मक्तेदार, अधिकाऱ्यांची ग्वाही

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()