Jalgaon News : जिल्‍हाधिकाऱ्यांची बॉलिंग, एसपींची बॅटिंग अन्‌ डीवायएसपींचे अर्धशतक

District Magistrate Ayush Prasad while bowling.
District Magistrate Ayush Prasad while bowling.esakal
Updated on

Jalgaon News : जिल्‍हा पोलिस दल आणि महसूल विभाग या दोन्ही शासकीय विभागांत नेहमी वरचढ कोण, अशी स्पर्धा बारा महिने चोवीस तास सुरू असते. शासकीय कामात एकमेकांना शह-काटशह देत आपापला तोरा जो-तो मिरवत असतो.

मात्र, जळगाव जिल्ह्याला जिल्हाधिकारी म्हणून आयुष प्रसाद आणि पोलिस अधीक्षक म्हणून एम.राजकुमार लाभले अन्‌ दोन्ही विभागांच्या समन्वयाचा पूल कायम झाला. (friendly cricket match between police and revenue department ensued jalgaon news)

पोलिस दलाच्या नाशिक विभागीय स्पर्धेत शनिवारी (ता. २५) पोलिस आणि महसूल विभागाचा मैत्रीपूर्ण क्रिकेट सामाना झाला. डीवायएसपी संदीप गावित यांच्या दमदार खेळामुळे जळगाव संघाने महसूल संघाचा पराभव केला. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी स्वतः समालोचन करीत सामन्यात रंगत आणली.

पोलिस कवायत मैदानावर ३४ वी नाशिक परिक्षेत्रीय क्रीडा स्पर्धा सुरू असून, शनिवार स्पर्धेच्या समारोपप्रसंगी सकाळी महसूल विभाग विरुद्ध पोलिस विभाग असा मैत्रीपूर्ण क्रिकेट सामना झाला. स्पर्धेला नाशिक परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर, पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी परिवारासह हजेरी लावली.

बारा षटकांच्या या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेत जळगाव संघाने १५१ धावांची संख्या उभारली. जळगावकडून उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित यांनी ५१, किरण कोळी यांनी ३८ धावा केल्या.

District Magistrate Ayush Prasad while bowling.
Jalgaon News: जळगाव जिल्ह्यात मृतांच्या नावाने ‘शस्त्र परवाने’; शस्त्र न घेतलेल्या 45 जणांचे परवाने रद्द

विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर यांचा झेल जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी टिपला. पोलिस संघाने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना महसूल संघाला फारसे यश आले नाही. पहिल्या चार षटकांतच महसूलचे चार खेळाडू तंबूत परतले.

पोलिस दलाने महसूल संघाला धुतले

पोलिस खेळाडू रतन गिते यांच्या भेदक गोलंदाजीने दोन षटकांत तीन धावा देत दोन बळी घेतले. रतन गिते उत्कृष्ट गोलंदाज, तर किरण कोळी उत्कृष्ट फलंदाज ठरले. महसूल संघाच्या एकही खेळाडूला मोठी धावसंख्या उभारता आली नाही.

शेवटच्या दोन षटकांत ६६ धावा आवश्यक असताना महसूलचा संघ आक्रमक झाला. ११ व्या षटकात धुव्वाधार फलंदाजी करीत महसूलच्या खेळाडूने तब्बल २८ धावा केल्या. धावांचा पाठलाग करताना महसूल संघ अपयशी ठरला.

District Magistrate Ayush Prasad while bowling.
Jalgaon News : भुईकोट किल्ल्यावर शौचालय नकोच; दुर्गप्रेमींसह पारोळेकरांचा विरोध

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.