Jalgaon : चोरीच्या दुचाकीसह भामटा अटकेत

jalgaon Crime Latest News
jalgaon Crime Latest Newsesakal
Updated on

जळगाव : शहरातील नवीन बसस्थानकाजवळील हॉटेल सुयोग समोरून तरुणाची दुचाकी लांबविणाऱ्या (Bike Thef) संशयिताला दुचाकीसह जिल्हापेठ पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. विकास उर्फ विक्की दारासिंग जाधव (वय २१, रा. वेल्हाळा, भुसावळ) असे अटकेतील संशयिताचे नाव आहे. (Fugitive criminal arrested with stolen two wheelerJalgaon Crime Latest News)

जिल्हापेठ पोलिसांच्या माहितीनुसार, भूषण सुनील राऊत (वय २६, रा. पिंप्राळा, चिंचपूरा) हा तरुण आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. २४ जून रोजी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास भूषण हा त्याची दुचाकी (एमएच १९ सीबी ९०५९) ने नवीन बसस्थानक जवळील हॉटेल सुयोगजवळ आला होता.

त्याने दुचाकी हॉटेल बाहेर पार्किंगमध्ये उभी करुन गेला. थोड्या वेळाने परतल्यावर त्याची दुचाकी जागेवर नव्हती शोधाशोध केल्यावरही सापडली नाही. जिल्हापेठ पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. पोलिस नाईक जुबेर तडवी पुढील तपास करीत होते.

jalgaon Crime Latest News
Jalgaon : भरधाव पिकअपच्या धडकेत दुचाकीस्वार ठार; महिला गंभीर जखमी

अन्‌ चोरटा अटकेत

बुधवारी (ता. १३) सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास जिल्हापेठचे पोलिस उपनिरीक्षक गणेश देशमुख, जुबेर तडवी, अमित मराठे असे साध्या वेशात जिल्हा रुग्णालयात गस्तीवर आले असताना एक तरुण संशयास्पद दिसून आला. पोलिसांचा संशय बळावल्यावर त्या तरुणाने दुचाकीसह रुग्णालयातून धूम ठोकली.

पोलीसांनी त्याचा पाठलाग करून स्वातंत्र्य चौकात पकडले. त्याच्या जवळील दुचाकीची चौकशी केल्यावर तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. ताब्यात घेतलेली दुचाकी दाखल गुन्ह्यातील असल्याचे निष्पन्न झाले. संशयित विकास उर्फ विक्की दारासिंग जाधव याला अटक करुन वाहन ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.

jalgaon Crime Latest News
Jalgaon : भरधाव पिकअपच्या धडकेत दुचाकीस्वार ठार; महिला गंभीर जखमी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.