Jalgaon Crime News : अल्पवयीन मुलीवर अत्याचार; फरारी संशयितास अटक

अत्याचाराच्या गुन्ह्यातील फरारी संशयिताला अमळनेर रेल्वे पोलिसांनी शिताफीने अटक करून त्याला सुरत पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.
crime
crimeesakal
Updated on

अमळनेर : अत्याचाराच्या गुन्ह्यातील फरारी संशयिताला अमळनेर रेल्वे पोलिसांनी शिताफीने अटक करून त्याला सुरत पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. (Fugitive suspect arrested for molesting minor girl jalgaon crime news)

सुरत येथील पांडेसरा पोलिस ठाणे येथे १८ जानेवारीला तैनात असलेले पोलिस उपनिरीक्षक दीपेंद्र सिंग यांनी अमळनेर आरपीएफचे सहाय्यक फौजदार कुलभूषणसिंग चौहान यांना माहिती दिली.

की संशयित मनोजसिंग (वय ४९, रा. श्रीराम नगर, पांडेसरा, सुरत) हा एका अल्पवयीन दहा वर्षीय मुलीवर अत्याचारचे कृत्य करून फरार झाला आहे. तो रेल्वे प्रवासात असून, अमळनेरच्या आसपास असल्याचे कळविले.

याची गंभीर दखल सहाय्यक फौजदार कुलभूषणसिंह चौहान यांनी संशयिताचे छायाचित्र पॅसेंजर ट्रेन मधील अमळनेर, धरणगाव, चावलखेडा आणि जळगाव येथील सर्व कर्मचाऱ्यांना पाठविले आणि भुसावळ पॅसेंजरची कसून तपासणी करण्यास सांगितले.

सहाय्यक फौजदार चौहान यांनी स्वत: गुन्ह्याचे गांभीर्य समजून तत्काळ कारवाई करण्यासाठी एक पथक तयार केले. ज्यामध्ये अर्जुन सिंग आणि संतोष कुमार यादव, दिनेश मांडळकर होते. ते देखील आरोपीच्या शोधासाठी रवाना झाले.

crime
Nanded Crime News : चिमुकलीची हत्या करणाऱ्याला अटक ; नराधमाने अत्याचारही केला, रोही पिंपळगाव येथील प्रकरण

अमळनेरहून जळगावपर्यंत आरोपीचा सखोल शोध घेण्यात आला, बऱ्याच प्रयत्नांनंतर सायबरवरून मिळालेल्या ठिकाणाचा तपास लावून संशयिताला अटक करण्यात आली.

जळगाव स्टेशनवर ट्रेन आल्यावर त्याला टीमसह जनरल डब्यातून पकडण्यात आले. ट्रेनमधून खाली उतरवून सुरक्षित स्थळी नेऊन त्याची चौकशी करण्यात आली.

पोलिसांनी त्याची ओळख पटवून त्याच्याकडे चौकशी केली असता संशयिताने स्वेच्छेने पोलिसांसमोर त्याच्याकडून केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली.

पोलिसांनी गुन्हा नोंदविल्यानंतर त्याच्याविरुद्ध आयपीसी, ४५० आणि पॉस्को कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक फौजदार कुलभूषणसिंह चौहान यांनी कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर संशयिताला सुरत (गुजरात) येथील पांडेसरा पोलिस टीमकडे सुपूर्द करण्यात आले.

crime
Jalgaon Crime News : ‘FDA’च्या 2 तोतया अधिकाऱ्यांना अटक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.