Jalgaon: ताडेपुरा तलाव संवर्धनासाठी साडेपाच कोटींचा निधी; मंत्री अनिल पाटील यांची नवीन वर्षात अमळनेरसाठी अनमोल भेट

या भरीव तरतुदीमुळे या तलावाचे भाग्य उजळून भविष्यात हा ‘पिकनिक स्पॉट’ ठरणार आहे
Anil Patil
Anil Patilesakal
Updated on

अमळनेर : राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी नवीन २०२४ वर्षाच्या प्रारंभीच अमळनेरकरांसाठी एक नवीन अनमोल भेट दिली असून, यात ताडेपुरा तलाव संवर्धनासाठी ५ कोटी ४३ लाखांचा भरघोस निधी आहे.

या भरीव तरतुदीमुळे या तलावाचे भाग्य उजळून भविष्यात हा ‘पिकनिक स्पॉट’ ठरणार आहे. (Fund of 5 half crores for Tadepura lake conservation Minister Anil Patils precious gift for Amalner in new year Jalgaon)

नगरविकास विभागाकडून अमळनेर नगरपरिषदेसाठी सदर निधी मंजूर झाला असून, या निधीतून विविध तलाव विकासाची कामे होणार असल्याने तलावाचे स्वरूप बदलणार आहे.

या निधीतून डेटा संकलन, सर्वेक्षण आणि पाण्याचे विश्लेषणसाठी ३ लाख, ‘एमबीबीआर’च्या सांडपाण्यावर जैविक प्रक्रिया करण्यासाठी २ कोटी, टॉयलेट ब्लॉक (स्त्रिया आणि पुरुष) निर्माण करण्यासाठी ४५ लाख, चेनलिंक, फेन्सिंग व तलाव भोवती भराव व फाउंडेशन करण्यासाठी ५० लाख, निर्माल्य कलश व मूर्ती इमर्शन टाकी बांधकामासाठी २५ लाख, सांडपाण्यासाठी चेंबरसह गटर बांधणे ३० लाख, पेव्हर ब्लॉकसह वृक्षारोपण, लँडस्केप, उद्यान विकास आणि मार्गासाठी ४५ लाख, सौरयंत्रणेवर विद्युतीकरणसाठी २५ लाख, सौर विसर्जित ‘वायुव्हिजन’साठी २५ लाख, ‘बेंच’साठी ७.५ लाख, जनजागृतीसाठी ५.० लाख, टॅक्स ८२.८९ लाख अशा एकूण ५ कोटी ४३ लाख ३९ हजार निधीतून तलावाचे संवर्धन होणार आहे.

या मंजुरीबद्दल मंत्री अनिल पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आभार व्यक्त केले आहेत.

Anil Patil
Nashik News: सोयगावसाठी हवे स्वतंत्र पोलिस ठाणे! वर्षभरात वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिक त्रस्त

मंगळग्रह मंदिरातील भाविकांसाठी पर्वणी

दरम्यान, चोपडा रस्त्यावर गेल्या अनेक वर्षांपासून अस्तित्वात असलेला ताडेनाला पूर्वी गणपती विसर्जनामुळे प्रकाशझोतात होता. मात्र काही वर्षांपासून हा नाला पूर्णपणे दुर्लक्षित झाल्याने मोठी दुरवस्था याची झाली आहे.

पावसाळ्यात अनेकदा या नाल्याला पूर येत असल्याने आजूबाजूच्या घरात पाणी घुसून नासधूस होत असे. वर्षभर पाणी असलेल्या या तलावाचे संवर्धन झाल्यास निश्चितच हा ‘पिकनिक स्पॉट’ ठरू शकतो आणि मंगळग्रह मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी देखील हा पर्वणी ठरू शकतो.

हा दृष्टिकोन मंत्री अनिल पाटील यांनी ठेऊन ताडे तलाव संवर्धनाचा प्रस्ताव शासन दरबारी सादर केला होता. अखेर त्यांच्या प्रयत्नाने शासनाने यास मंजुरी दिल्याने या तलावाचे भाग्य उजळले आहे.

Anil Patil
Nashik News: मालेगावला मालवाहतूक चालकांकडून नियमांचे उल्लंघन; अवजड वाहनांचा सुळसुळाट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.