Jalgaon News : शहरातील प्रभागातील निधी दुसऱ्या प्रभागात पळविण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नगरसेवकांत सुंदोपसुंदी सुरू आहे. (funds from one ward in city are being diverted to another ward jalgaon news)
मेहरुण तलावाच्या विकासासाठी शासनाकडून मिळालेला निधी प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर कामे सुरू होणार त्यापूर्वीच प्रस्तावित कामे रद्द करून हा निधी दुसऱ्या प्रभागात कामांसाठी हा निधी वळविण्यात आला आहे. नगरसेवकांचा कालावधी संपत असताना, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या माध्यमातून हा निधी काही नगरसेवक आपल्या प्रभागात वळवित असल्याचे सांगण्यात येत आहे.
राज्य सरकारकडून शहरातील रस्त्यांसाठी मुलभूत सोयीसुविधा अंतर्गत १५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. या निधीतून शहरातील एका प्रभागातील रस्त्यांची कामे प्रस्तावित करण्यात आली होती, तसेच मेहरुण तलावाची संरक्षण भिंत व विकासकामांचाही त्यात सामवेश होता. या कामांचे इस्टिमेट झाले.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
तांत्रिक मान्यता व प्रशासकीय मान्यताही मिळाली होती. त्यामुळे या कामांची निविदा प्रक्रिया राबविण्यात येऊन प्रत्यक्ष कामांना सुरवात होणार होती. मात्र, त्याच वेळी प्रस्तावित कामे रद्द करून हा निधी दुसऱ्याच प्रभागात वळविण्यात आला असल्याचे सांगण्यात आले.
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या माध्यमातून विकासकामांचा हा निधी वळविण्यात येत असल्याची चर्चा काही नगरसेवक दबक्या आवाजात करीत आहेत.
नगरसेवकांची पाच वर्षांची मुदत आता पूर्ण होणार आहे. अशा स्थितीत कामाचे श्रेय घेण्यासाठी निधीची पळवापळवी सुरू असल्याचेही सांगण्यात येत आहे. ज्या प्रभागात विकासकामांची गरज आहे, त्या प्रभागातील नागरिकांवर मात्र अन्याय होत असल्याचेही दिसून येत आहे. निधी पळवापळवीवरून महापालिकेच्या महासभेत जोरदार वाद होण्याचीही शक्यता व्यक्त होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.