Jalgaon News : एरंडोलला एकाच वेळी निघाल्या तिघांच्या अंत्ययात्रा; मन हेलावणारा आक्रोश!

The crowd attended the funerals of the three youths.
The crowd attended the funerals of the three youths. esakal
Updated on

Jalgaon News : रामेश्वर येथे नदीच्या पात्रात बुडून मृत झालेल्या तिन्ही युवकांवर आज दुपारी दोनच्या सुमारास हजारो नागरिकांच्या उपस्थितीत शोकाकुल वातावरणात एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आले.

युवकांचे नातेवाइक, मित्र यांचा आक्रोश मन हेलावणारा होता. शहरातील व्यावसायिकांनी स्वयंस्फूर्तीने व्यवसाय बंद ठेवून मृतांना श्रद्धांजली वाहिली.

शहरातून सोमवारी (ता. २१) सकाळी श्रावण महिन्यातील पहिला सोमवार असल्यने सुमारे २०० युवकांनी रामेश्वर येथे पायी कावडयात्रा काढली. रामेश्वर येथे कावडयात्रा पोहोचल्यावर युवकांनी नदीच्या पात्रात अंघोळ केली. (Funeral of 3 youth in Rameshwar incident jalgaon news)

या वेळी पाण्याचा अंदाज न आल्याने अक्षय ऊर्फ भय्या प्रवीण शिंपी, सागर अनिल शिंपी, पीयूष रवींद्र शिंपी या एकाच कुटुंबातील तीन युवकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. तिन्ही युवकांचे मृतदेह मंगळवारी (ता. २२) दुपारी साडेबाराच्या सुमारास तीन रुग्णवाहिकांमधून त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आले.

तिन्ही युवकांचे मृतदेह निवासस्थानी पोहोचताच त्यांचे नातेवाईक व मित्र परिवार यांनी आक्रोश केला. एकला तिन्ही युवकांची एकाच वेळी अंत्ययात्रा काढण्यात आली. दोनच्या सुमारास कासोदा रस्त्यावरील स्मशानभूमीत तिन्ही युवकांवर एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी उपस्थित हजारो नागरिक भावनाविवश झाले होते.

मृत युवकांचे ८५ व ७८ वर्षीय वासुदेव शिंपी व बबन शिंपी या दोन्ही आजोबांचा आक्रोश मन हेलावणारा होता. ७८ वर्षीय बबन शिंपी यांचे दोन नातू, तर ८० वर्षीय वासुदेव शिंपी यांचा एक नातू यांचा नदीत बुडून मृत्यू झाला. एकाच कुटुंबातील तीन युवकांचा मृत्यू झाल्याने शहरावर शोककळा पसरली होती.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

The crowd attended the funerals of the three youths.
Jalgaon Police Transfer : जिल्ह्यात पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या; कर्मचाऱ्यांना विनंती बदल्यांची प्रतीक्षा

सकाळपासूनच तिन्ही युवकांच्या निवासस्थानाजवळ नागरिकांनी गर्दी केली होती. कावडयात्रेत सहभागी झालेले युवकही या वेळी भावनाविवश झाले होते. युवकांचे आई, वडील, भावंड, आजोबा व नातेवाईक यांच्या आक्रोशामुळे उपस्थितांच्या डोळ्यांतही अश्रू जमा झाले होते. या वेळी उपस्थित पदाधिकारी, समाजबांधव त्यांचे सांत्वन करून धीर देण्याचा प्रयत्न करीत होते.

अंत्ययात्रेत आमदार चिमणराव पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख डॉ. हर्शल माने, बाजार समितीचे माजी सभापती शालिग्राम गायकवाड, माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी, दशरथ महाजन, रवींद्र महाजन, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आमले, काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी विजय महाजन, माजी सदस्य नाना महाजन, माजी नगरसेवक प्रा. मनोज पाटील, शिवसेनेचे तालुकाप्रमुख रवींद्र जाधव, विधानसभा क्षेत्रप्रमुख सुदाम राक्षे, युवासेनेचे जिल्हा समन्वयक अतुल महाजन, शिवसेना ठाकरे गटाचे शहरप्रमुख कुणाल महाजन, विधानसभा क्षेत्रप्रमुख जगदीश पाटील, ‘राष्ट्रवादी’चे जिल्हा सरचिटणीस आर. डी. पाटील, भाजपचे शहराध्यक्ष नीलेश परदेशी, अँग्लो ऊर्दू हायस्कूलचे अध्यक्ष जहिरोद्दिन शेख कासम, माजी नगरसेवक जगदीश ठाकूर यांच्यासह राजकीय, सामाजिक, शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी, अहिर क्षत्रिय शिंपी समाजाचे पदाधिकारी यांच्यासह हजारो नागरिक सहभागी झाले होते.

मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाखांची शासकीय मदत

आमदार चिमणराव पाटील यांनी सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. शासनातर्फे तिन्ही युवकांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची शासकीय मदत देण्यात येणार असल्याचे आमदार चिमणराव पाटील यांनी या वेळी सांगितले. सकाळी तहसीलदार सुचिता चव्हाण, विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी मृतांच्या निवासस्थानी कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन केले.

The crowd attended the funerals of the three youths.
Jalgaon Talathi News : तलाठ्यांना आता उपस्थितीचे वेळापत्रक द्यावे लागणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.