Ganeshotsav 2023 : शिस्त, संस्कारातून जळगावच्या उत्सवाचा देशभरात लौकिक; गणेशोत्सव महामंडळाची भावना

Office bearers of various boards during the meeting of Public Ganeshotsav Corporation held on Thursday at 'Sakal' office.
Office bearers of various boards during the meeting of Public Ganeshotsav Corporation held on Thursday at 'Sakal' office. esakal
Updated on

Ganeshotsav 2023 : गेल्या तीस वर्षांपूर्वीचा उत्सव व आताच्या उत्सवात खूप फरक आहे. गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाने ठरवून दिलेली आचारसंहिता तंतोतत पाळली.

स्वयंशिस्त, संस्कारातून दरवर्षी जळगावच्या उत्सवाची उंची वाढतच आहे. हा उत्सव थांबणार नाही, कार्यकर्ते थकणार नाहीत. तो अजून भव्यदिव्य होईल. अशा भावना सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे पदाधिकाऱ्यांनी मांडली.

‘सकाळ संवाद’अंतर्गत गुरुवारी (ता. २१) ‘सकाळ’च्या शहर कार्यालयात महामंडळ व गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांचे चर्चासत्र झाले. त्यात मंडळांच्या सदस्यांनीही मंडळांचे उपक्रम व उत्सवाच्या स्वरुपाबद्दल भूमिका मांडली. मुख्य बातमीदार सचिन जोशी यांनी सूत्रसंचालन केले.

(लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर फक्त एका क्लिकमध्ये)

सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांवर भर

‘सकाळ’च्या या चर्चासत्रात विविध मंडळांच्या कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. मंडळाची परंपरा, पारंपरिक वाद्यांसह ढोल-ताशे, लेझीम पथक, सामाजिक, सांस्कृतिक उपक्रम, भजन- प्रवचन, कीर्तनादी कार्यक्रमांवर मंडळं भर देत असल्याचे सदस्यांनी सांगितले. गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिरांमधून सेवा करण्याचा मंडळांनी संकल्प केला.

चर्चेत यांचा सहभाग

या चर्चेत शाहूनगर मित्र मंडळाचे किशोर देशमुख, वज्रेश्‍वरी मित्र मंडळाचे धनंजय चौधरी, चंद्रप्रभा कॉलनी मंडळाचे विराज पाटील, गुरुनानक नगरातील श्री बाबा सेवादास मंडळाचे राजेश सनकत, दीक्षित वाडीतील नवप्रगती मातंगऋषी मंडळाचे गजू शिरसाठ, विसनजी नगरातील गौरीसुता मित्र मंडळाचे साई सराफ, श्री गणाधीश फाउंडेशनचे विनोद अनपट, स्टेशन रोड मंडळाचे गोविंद बाहेती,

लिधुर वाड्यातील शिवभक्त तरुण सांस्कृतिक मंडळाचे निखील सोनवणे, दाणाबाजार मित्र मंडळाचे धीरज पुरोहित, अमर चौक मित्र मंडळाचे विपुल पाटील, महामंडळाचे सूरज दायमा, गवळी वाड्यातील श्रीकृष्ण मित्र मंडळाचे वसंत गवळी, पंचरत्न मंडळाचे कल्पेश तिलकपुरे, अचानक मित्र मंडळाचे भूषण शिंपी, खडके चाळीतील गुरुदत्त बहुउद्देशीय उत्सव समिती मंडळाचे दीपक झुंझारराव यांनी सहभाग घेतला.

"अनेक वर्षांपासून आमचे मंडळ कार्यरत आहे. मंडळातर्फे दरवर्षी रक्तदान शिबिर, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप आदी उपक्रम राबविले जातात. यंदा उज्जैनचे ढोल व झांज पथक विसर्जन मिरवणुकीतील वैशिष्ट्य असेल. महामंडळामुळे सर्व मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा निर्माण होण्यासह मंडळं, त्यांचे उपक्रम, विसर्जन मिरवणुकीत शिस्त निर्माण झाली. "-सुरेश सोनवणे, महाराणा प्रताप मंडळ

Office bearers of various boards during the meeting of Public Ganeshotsav Corporation held on Thursday at 'Sakal' office.
Konkan Ganeshotsav : महाराष्ट्रात असं एक गाव आहे, तिथं कुणाच्याही घरी गणपती प्रतिष्ठापना होत नाही; काय आहे कारण?

"अनेक वर्षांपासून आपण एम. जी. रोड मंडळातर्फे धार्मिक देखाव्यांची आरास साकारतो. यंदा जेजुरीच्या खंडोबाची आरास आहे. ज्यांना प्रत्यक्ष त्या तीर्थक्षेत्री जाता येत नाही, त्यांना इथेच दर्शन व्हावे, धार्मिकतेतून संस्कार यावा, हा उद्देश आहे. शहिदांना श्रद्धांजलीचे उपक्रमही यानिमित्ताने राबविण्यात येत आहेत. "-दीपक जोशी, सदस्य, गणेशोत्सव महामंडळ

"गणेशोत्सव महामंडळास अनेक तरुण कार्यकर्ते जोडले जात आहेत. त्यामुळे हा उत्सव कधी थांबणार नाही. तो यापुढे आणखी ताकदीने पुढे जाईल. तीस वर्षांपूर्वी समाजाचा मंडळांबद्दल जो वाईट दृष्टीकोन होता, तो आता बदलला असून, मंडळांकडे आदराने पाहिले जाते. सन्मान केला जातो. हे महामंडळाच्या तीस वर्षांतील कामाचे फलित आहे. परंतु, प्रत्येक मंडळाने महामंडळास किमान एक कार्यकर्ता द्यावा, म्हणजे उत्सव आणखी भव्य होईल." -किशोर भोसले, सदस्य, गणेशोत्सव महामंडळ

समानता, समरसतेचा उत्सव

"गणेशोत्सव केवळ स्वत:साठी नाही, तर बाप्पाच्या श्रद्धेपोटी, समाजाच्या सेवेसाठी असल्याचे आपण सिद्ध केलेय. हा समानतेचा, समरसतेचा उत्सव आहे. उत्सवात कुणी कुणाला जात, पंथ, आर्थिक स्तर विचारत नाही.

सर्वच घटक उत्स्फूर्तपणे यात सहभागी होतात. उत्सवाच्या परंपरेचे आपण पाईक आहोत. शिव राज्याभिषेकाच्या ३५०व्या वर्षानिमित्त शिवरायांना मानवंदना देण्यासह समरसतेची आरती असे उपक्रम राबविण्यात येत आहेत." -सचिन नारळे, अध्यक्ष, गणेशोत्सव महामंडळ

Office bearers of various boards during the meeting of Public Ganeshotsav Corporation held on Thursday at 'Sakal' office.
Konkan Ganeshotsav : गणेश विसर्जनात मगरींचं विघ्न; जीव मुठीत धरून करावं लागतंय बाप्पाचं विसर्जन, नदीत फोडले जाताहेत बॉम्ब!

देशभरात लौकिक

गेल्या काही वर्षांपासून मंडळांच्या कार्यकर्त्यांनी आचारसंहिता काटेकोरपणे पाळली. विसर्जन मिरवणुकीतील शिस्त, चित्तथरारक प्रात्यक्षिके, पारंपरिक नृत्य, लेझीम- झांज पथक, डीजे व गुलालमुक्त उत्सव ही वैशिष्ट्ये आहेत. त्यामुळे राज्यातच नव्हे, तर देशात आपल्या जळगावच्या उत्सवाचा लौकिक झाल्याची भावना सचिन नारळे यांनी बोलून दाखवली.

महामंडळाच्या शिस्तीत संस्काराची शिदोरी

गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी महामंडळाबद्दल भावना व्यक्त केल्या. मंडळांना परवानगी, अडी-अडचणींचे निराकरण, विसर्जन मिरवणुकीत रांगेत येण्यासाठीची परवानगी ही महामंडळाच्या प्रयत्नांनी शक्य झाली. महामंडळाने मंडळांच्या सदस्यांना स्वयंशिस्त शिकविली. त्यातून संस्काराची शिदोरी मिळाली. समाजाची आमच्याबद्दलची मानसिकता बदलण्यात महामंडळाचे योगदान मोठे असल्याची भावना कार्यकर्त्यांनी बोलून दाखविली.

Office bearers of various boards during the meeting of Public Ganeshotsav Corporation held on Thursday at 'Sakal' office.
Sangli Ganeshotsav : आकर्षक सजावट अन् लक्षवेधी गणेश मूर्ती; पाहा लाडक्या बाप्पाची विविध रुपातील झलक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()