Ganeshotsav 2023: यंदा गणेशोत्सव 19 दिवस उशीरा; मूर्ती घडविण्यासाठी कारागिरांची लगबग

Artisans making Ganpati Bappa idol in factory
Artisans making Ganpati Bappa idol in factoryesakal
Updated on

Ganeshotsav 2023 : यंदा अधिक मासामुळे गणपती बाप्पाचे आगमन १९ दिवस उशिराने होणार आहे. अडीच महिन्यांनी घरोघरी गणरायाचे विराजमान होणार असले, तरी गणेशमूर्ती मूर्ती घडविण्यासाठी कारागिरांची आतापासून लगबग सुरू झाली आहे.

या वर्षी कच्चा माल २० ते २५ टक्के महागल्यामुळे गणेशमूर्तीचे दरही वाढणार आहेत. प्रामुख्याने वाहतूक खर्चात मोठी वाढ झाली आहे. (Ganeshotsav 2023 19 days late this year crowd of artisans to make idol jalgaon)

गणेशोत्सव अडीच महिन्यांवर आला आहे. घरोघरी व सार्वजनिक मंडपात गणेशमूर्तीची स्थापना केली जाते. जळगावात लहान, मोठ्या आकारातील मूर्तींना मागणी असते. कारखान्यात गणेशमूर्तींचे काम सुरू झाले आहे.

...असाही योगायोग

अधिक मासामुळे गणपती बाप्पाचे आगमन १९ दिवस उशिराने होणार आहे. त्यामुळे लाडक्या बाप्पाची गणेशभक्तांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.

यंदा अधिक मासाला तब्बल १९ वर्षांनी असा योग जुळून आला असून, हिंदू पंचांगानुसार या वेळी अधिक मास १८ जुलैपासून सुरू होत आहे आणि तो १६ ऑगस्टला समाप्त होईल.

यापूर्वी असा योगायोग २००४ मध्ये जुळून आला होता आणि त्या वेळीही १८ जुलैपासून अधिका मास सुरू होऊन १६ ऑगस्टला संपला होता.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Artisans making Ganpati Bappa idol in factory
Ganeshotsav 2023 : उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार : जिल्हाधिकारी मनीषा खत्री

‘श्रीं’चे १९ सप्टेंबरला आगमन

मागील वर्षी ३१ ऑगस्टला गणपती बाप्पाचे आगमन झाले होते, तर ९ सप्टेंबरला अनंत चतुर्थीला निरोप देण्यात आला होता.

या वर्षी मात्र १९ सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला सुरवात होईल, तर २८ सप्टेंबरला अनंत चतुर्दशी आहे. १० दिवस गणरायाचा मुक्काम असणार आहे. गणेशोत्सव लांबणीवर असला, तरी मूर्तिकार सध्या कामाला लागले आहेत.

"सध्या गणेशमूर्ती बनविण्याची लगबग सुरू झाली आहे. मूर्तीची सफाई, प्रायमर देणे, मोठ्या मूर्तीसाठी लोखंडी ट्रॉलीची डागडुजी आदी कामे सुरू आहेत. आणखी १५ दिवसांनी कामातून जराही उसंत मिळणार नाही."-मनोज शिंपी, मूर्तिकार

Artisans making Ganpati Bappa idol in factory
Ganeshotsav 2023: कारागृहाच्या महसुलात होणार वाढ! कैद्यांनी तयार केलेल्या मूर्ती पाहण्यासाठी लगबग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.