Ganeshotsav 2023 : गणेश मंडळांचा धार्मिक, ऐतिहासिक आरासवर भर; आरास, देखावे खुले

Ganeshotsav 2023 : गणेश मंडळांचा धार्मिक, ऐतिहासिक आरासवर भर; आरास, देखावे खुले
Updated on

Ganeshotsav 2023 : गणेशोत्सवात गणेश मंडळांनी आरास, देखावे भाविकांना पाहण्यासाठी खुले केले आहेत. यंदा अनेक गणेश मंडळांनी धार्मिक देखावे, आरास, इतिहासकालीन देखावे, वस्तूंचे प्रदर्शन भरवून भाविकांना तल्लीन करण्याचा प्रयत्न केला आहे. सायंकाळी सर्वत्र श्रीगणेशाची स्तुती गीते लावली जात आहेत. त्यामुळे भक्तिमय, आल्हाददायक वातावरणनिर्मिती होत आहे.

गुरुवारी (ता. २१) सायंकाळी पाऊस होता. यामुळे गणेशभक्तांना पावसाचा व्यत्यय सहन करीत देखावे पाहावे लागले. शुक्रवारी दुपारपर्यंत पाऊस होता. नंतर मात्र पावसाने उघडीप दिल्याने सायंकाळी गणेशभक्तांनी गणेशमूर्ती, आरास, देखावे पाहण्यासाठी गर्दी केली होती. (ganeshotsav 2023 Emphasis on religious historical celebration of Ganesh mandals jalgaon news)

...असे आहेत देखावे

शहरातील मुख्य भाग असलेला महापालिकेने यंदा मोठी मूर्ती बसवून ‘चांद्रयान-३’ची आरास तयार केली आहे. नवीपेठेतील श्रीमंत शिवा मंडळाने श्री गणेशाची आकर्षक मूर्ती बसविली आहे. नवीपेठतील नेहरू चौक मित्रमंडळाने ‘गुजरात येथील सोमनाथ’ मंदिराची आरास केली आहे.

आकर्षक रोषणाई करून भाविकांचे लक्ष वेधले आहे. जयकिसन वाडीतील जयकिसन वाडी गणेश मित्रमंडळाने विठ्ठलाच्या रूपातील गणेशमूर्ती बसविली असून, शेजारी वारकरी, असा देखावा सादर केला आहे.

अनेकांना मिळाला रोजगार

गणेशोत्सवात भाविकांची गर्दी होते. त्याअनुषंगाने अनेकांनी विविध ठिकाणी खाद्यपदार्थ, खेळणी, शीतपेय, घरगुती वस्तूंसह अनेक साहित्यांची दुकाने लावली आहेत. अनेकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. लाखोंची उलाढाल होत आहे.

नारळाची लाखांची उड्डाणे

कोणतीही पूजा नारळाशिवाय पूर्णत्वास जात नाही. धार्मिकदृष्ट्या नारळाला विशेष मान आहे. शास्त्रामध्ये नारळाला श्रीफळ म्हणजेच लक्ष्मीचे फळ म्हटले आहे.

Ganeshotsav 2023 : गणेश मंडळांचा धार्मिक, ऐतिहासिक आरासवर भर; आरास, देखावे खुले
Nashik Ganeshotsav 2023: मौल्यवान गणपतीसाठी कडेकोट सुरक्षा! आयुक्तांकडून सुरक्षिततेबाबत तंबी

गौरीगणेशोत्सवात घरगुती, तसेच सार्वजनिक मंडळाच्या गणेशाच्या पूजेसाठी ‘श्री’च्या चरणी नारळ व नारळाचे तोरण अर्पण केले जात असल्याने जिल्ह्यामध्ये नारळाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. गणेश चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत लाखो रुपयांची उलाढाल नारळ व्यवसायातून होत असते.

जिल्ह्यात सुमारे साडेतीन लाख गणेशमूर्तीची स्थापना झाली आहे. शिवाय जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी बाप्पांची प्रतिष्ठापना केली आहे. प्रत्येक पूजेला किमान पाच नारळाची गरज असतेच. गणेश नैवेद्य दाखविण्याकरिता ओले खोबरे वापरले जाते. सर्व धार्मिक विधीमध्ये मोठ्या प्रमाणात नारळाची गरज लागते. कलश स्थापनेसाठी व नारळाच्या सोरणांसाठी नारळाला मागणी आहे. वीस ते तीस रुपये प्रतिनग अशा किमती आहेत.

"नारळाला कायम ग्राहकांकडून मागणी असते. पूजेसाठी, प्रसादासाठी, पात्र बनवताना नारळाचा वापर होतो. पूजेसाठी लहान, तर प्रसादासाठी मोठा नारळ वापरला जातो. वीस ते तीस रुपयांदरम्यान नारळाचा दर आहे." -गणेश पाटील, नारळविक्रेता

Ganeshotsav 2023 : गणेश मंडळांचा धार्मिक, ऐतिहासिक आरासवर भर; आरास, देखावे खुले
Miraj Ganeshotsav : ठाकरे सेनेच्या कमानीवर गुवाहाटीचे चित्र; शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांचा आक्षेप, वाद चिघळण्याची शक्यता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.