Jalgaon Crime News : दुचाकी चोरणारी टोळी गजाआड; एमआयडीसी पोलिसांची कामगिरी

A gang of two-wheeler thieves arrested by the MIDC police teams along with the officers and staff of the police team.
A gang of two-wheeler thieves arrested by the MIDC police teams along with the officers and staff of the police team.esakal
Updated on

Jalgaon Crime News : शहर व जिल्हा, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, बीड या जिल्ह्यातून दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीला एमआयडीसी पोलिसांनी अटक करीत गजाआड केले. यावेळी पोलिसांनी या टोळीकडून नऊ दुचाकी देखील जप्त केल्या.

या कारवाईत पोलिसांनी प्रमुख सूत्रधारासह तिघांना अटक केली असून यात एका अल्पवयीन मुलाचा देखील समावेश आहे. (gang of bike thieves arrested by MIDC police jalgaon crime news)

या सर्वांविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहर व जिल्ह्यात वाहन चोरीचे वाढते गुन्हे लक्षात घेता जिल्‍हा पोलिस अधीक्षक एम.राजकुमार, अप्पर अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी प्रत्येक पोलिस ठाण्यास दाखल गुन्हे उघडकीस आणण्या बाबत सुचना केल्या होत्या. त्यानुसार एमआयडीसी पोलिसांनी ही कारवाई केली.

एमआयडीसीतील राम दालमिल कंपनीच्या गेटसमोरून भुषण दिलीप पाटील (रा. जुने जळगाव) यांची दुचाकी (एमएच १९ डीवाय ८४९०) २९ जुलैला चोरीला गेली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्याचा तपास सुरु होता. या गुन्ह्याचा शोध सुरू असताना मेहरूण परिसरात काही तरुण बाहेरगावाहून महागड्या दुचाकी चोरून आणून विक्री करण्याच्या तयारीत असल्याची गुप्त माहिती पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाली होती.

A gang of two-wheeler thieves arrested by the MIDC police teams along with the officers and staff of the police team.
Jalgaon Crime News : अंतुर्ली येथील तिघांविरुद्ध ‘ॲट्रॉसिटी’चा गुन्हा दाखल

गुन्हे शोध पथकातील उपनिरीक्षक दीपक जगदाळे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, पोलिस हेडकॉन्स्टेबल गणेश शिरसाळे, योगेश बारी, किशोर पाटील, सचिन पाटील, पोलिस शिपाई छगन तायडे, किरण पाटील, ललित नारखेडे आदींनी माहितीचा पाठपुरावा करून मंगळवारी (ता.१७) रात्री आठला संशयित आरोपी दानीश शेख कलीम (वय २० रा. पिरजादेवाडा मेहरूण), सोमनाथ जगदीश खत्री (वय २१ रा. जोशीवाडा मेहरूण), आवेश बाबूलाल पिंजारी (वय २० रा. मेहरूण) आणि एक अल्पवयीन मुलगा यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता चोरीच्या नऊ दुचाकी काढून दिल्या. या दुचाकी त्यांनी जळगाव, छत्रपती संभाजी नगर, नाशिक आणि बीड जिल्ह्यातून चोरी केल्याची कबुली दिली आहे.

एका जिल्ह्यात चोरी, दुसऱ्या जिल्ह्यात विक्री

दुचाकी चोरीप्रकरणी अटक करण्यात आलेली टोळी जिल्ह्यातून एका मागून एक महागडी वाहने चोरुन ते दुसऱ्या जिल्ह्यात मिळेल त्या भावात विकून टाकायचे. नंतर पुन्हा दुसऱ्या जिल्ह्यात वाहनांची चोरी करीत दुसऱ्या जिल्ह्यात जावून ती वाहने विकून टाकायचे.

A gang of two-wheeler thieves arrested by the MIDC police teams along with the officers and staff of the police team.
Jalgaon Crime News : गँगवार पद्धतीने गुन्हे करणारे अट्टल गुन्हेगार हद्दपार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.