Jalgaon Crime : 16 मोटारसायकलींसह चोरट्यांची टोळी अटकेत; खेड्या-पाड्यांपर्यंत जाळे

Gang of thieves arrested with 16 motorcycle jalgaon crime news
Gang of thieves arrested with 16 motorcycle jalgaon crime newsesakal
Updated on

Jalgaon Crime : उत्तर महाराष्ट्र, विदर्भासह गुजरात राज्यातून चोरून आणलेल्या दुचाकी अवघ्या १० ते १५ हजारांत विक्री करुन मौज करणाऱ्या टोळीच्या हाती अखेर बेड्या पडल्या आहेत. एरंडोली तालुक्यातील या टोळीने चोरीच्या तब्बल १६ दुचाकी काढून दिल्या असून, त्यांच्या अन्य साथीदारांचा पोलिस शोध घेत आहेत.

जळगाव शहरासह संपुर्ण जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत मोटारसायकल चोरीच्या घटना रोजच घडत असल्याने चोरट्यांवर लक्ष केंद्रीत करण्याच्या सुचना पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी स्थानिक गुन्हेशाखेला दिल्या होत्या.

गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांनी त्यानुसार खास पथकाची नेमणुक केली. (Gang of thieves arrested with 16 motorcycle jalgaon crime news)

गाव-तालूक्यातील भामटे, भुरटे चोर आणि पैशांची उधळण करणारे, नव्या वाहनांचा नाद असणाऱ्यांची माहिती काढत असतानाच पिंप्री सिम (ता. एरंडोल) येथील सुनील भिल याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याच्या परिचितांकडून गुप्त माहिती संकलीत करून त्याला ताब्यात घेण्यात आले.

सुरवातीला उडवा उडवीची उत्तरे देणाऱ्या सुनीलने पोलिसी खाक्या दाखवताच त्याच्या जवळील दुचाकी चोरीची असल्याचे कबुल करत आणखी ३ दुचाकी काढून दिल्या. विना कागदपत्रांच्या या दुचाकी नांगदुली (ता. एरंडोल) येथील खुशाल पाटील व गोविंदा कोळी यांच्याकडून कमी किमतीत विकत घेतल्याचे सांगितले.

त्यानुसार पाटील आणि कोळी यांना ताब्यात घेतले असता, आणखी ९ मोटरसायकली हस्तगत करण्यात आल्या. चौकशीची तिसरी फेरी सुरु झाल्यावर सुनीलने पाचोरा तालुक्यातील हर्षल पाटील (राजपूत) याचे नाव सांगितले. त्याच्याकडूनही चोरीच्या ४ दुचाकी हस्तगत केल्या आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Gang of thieves arrested with 16 motorcycle jalgaon crime news
Crime : 'तुझ्या नवऱ्याला जामिनावर सोडवतो...' असं म्हणत मध्यरात्री दीराचा भावजयीवर अत्याचार

मास्टरमाईंड अकोला येथील चोरीच्या या १६ मोटारसायकली वेगवेगळ्या जिल्ह्यांतील असल्याचे निष्पन्न झाले. गुन्ह्याचा मास्टरमाईंड संतोष इंगोले (रा. अकोला) हा ही वाहने मिळेल त्या किंमतीत या चौघांना विक्रीसाठी आणुन देत होता. मोटारसायकली विक्रीतून मिळणाऱ्या बक्कळ पैशांतून चौघांची मौजमजा सुरु होती.

परिश्रम फळाला

दरम्यान, या चौकडीवर नजर ठेवण्यासाठी खबऱ्यांची पेरणी करुन अनेक दिवस त्यांची माहिती व हालचालींची नोंद घेण्यात आली. वरिष्ठ निरीक्षक श्री. पाटील यांच्या पथकातील सहाय्यक निरीक्षक निलेश राजपूत, उपनिरीक्षक गणेश वाघमारे, गणेश चौबे, सहायक फौजदार अनिल जाधव, संदीप सावळे, नंदलाल पाटील, महेश महाजन, जयंत चौधरी, अनिल चौधरी, प्रीतम पाटील, पोलीस नाईक भगवान पाटील, हेमंत पाटील, किरण चौधरी, ईश्‍वर पाटील, लोकेश माळी, गोरख बागुल, उमेश गोसावी, चालक पोलीस नाईक अशोक पाटील, मोतीलाल चौधरी, प्रमोद ठाकूर यांनी सुनील शामराव भिल (वय ३५, रा. पिंप्री सिम, ता. एरंडोल), खुशाल उर्फ भैय्या राजू पाटील (वय २०), गोविंदा अभिमन्यू कोळी (वय ४५, दोघे रा. नागदुली, ता. एरंडोल) आणि हर्षल विनोद कोळी (वय २०, रा. मोहाडी ता. पाचोरा) या चौघांना ताब्यात घेत गुन्हा उघडकीस आणला आहे.

Gang of thieves arrested with 16 motorcycle jalgaon crime news
Jalgaon Crime News : चोरीच्या दुचाकींसह ‘तो’ विकतो तलवारी! दुचाकी चोरीच्या चौकशीत माहिती उघड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.