कजगाव (ता. भडगाव) : भडगाव पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गांजा तस्करी प्रकरणातील संशयित आरोपी भिकन रायभान पाटील याची तीन दिवसांची पोलिस कोठडी संपल्यानंतर त्याला आज न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला पुन्हा एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.
या गुन्ह्यातील दुसरा संशयित अद्याप फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. (Ganja smuggling suspect in custody Police still searching for second absconding suspect Jalgaon Crime)
संशयितांनी हा गांजा नेमका कुठून आणला याचा तपास पोलिस करीत आहेत. गांजा तस्करीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर कजगाव, भडगाव परिसरात गांजा मोठ्या प्रमाणात तस्करी होत असल्याचे उघड झाले आहे. या भागात गांजाची विक्री करणारे आणखीन काही विक्रेते असावेत, अशी चर्चा आहे.
यापूर्वी देखील ‘डीजे’च्या वाहनातून गांजा वाहतूक करताना पोलिस प्रशासनाने कारवाई केली होती. शिरपूरसह धुळे भागातून गांजा उपलब्ध होत असल्याने मिळून आलेला गांजा नेमका कुठला आहे, याचा शोध घेऊन मुख्य विक्रेत्यापर्यंत पोचण्याचे पोलिसांसमोर सध्या आव्हान आहे.
कनाशी बनतेय गांजा केंद्रबिंदू
गांजा तस्करी प्रकरणी संशयित आरोपी भिकन पाटील व अतुल उर्फ बबलू पुजारी हे दोघे कनाशी (ता. भडगाव) येथील रहिवासी आहेत. यापूर्वी देखील गांजा तस्करीच्या कारवाईत कनाशी येथील तरूणांचा सहभाग दिसून आला होता.
शिरपूर, धुळे येथून कजगाव, कनाशी परिसरात येण्यासाठी जंगलाचा मोठा लागतो. यामुळे गांजा तस्करीसाठी कनाशी गाव सोयीचे ठरू पाहत आहे. त्यामुळे कनाशी गाव गांजा विक्रीचे केंद्र बनतेय काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणाची कसून चौकशी करुन या धंद्यातील म्होरक्यावर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.