Jalgaon Flood News : परिसरात मुसळधार पावसाने हाहाकार माजला असून, सहा तास धुव्वाधार बरसलेल्या पावसाने परिसरातील नदी-नाले दुथडी वाहून निघाले आहेत. या पावसामुळे आलेल्या पुराने रौद्ररुप धारण केले होते.
फैजपुराच्या गावठाण भागाला पुराने वेढा घातला असून, शहराच्या उत्तरेस असलेल्या इस्लामपुरा व दक्षिणेस असलेल्या पाठणवाडी परिसरातील घरांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने नागरिकांचे संसारोपयोगी वस्तूंचे नुकसान झाले आहे.
बुधवारी सकाळी नऊला मुसळधार पावसाला सुरुवात झाली होती. सतत सहा तास बरसलेल्या संतधारेने हाहाकार माजला. (Gaothan area of Faizpur surrounded by flood jalgaon news)
सातपुडा पर्वताकडून येणाऱ्या धाडी नदी, बेलवाई नदी व न्हावीकडून आलेल्या लेंडीनाला महापूर आल्याने रौद्ररूप धारण केले होते.
फैजपुराच्या गावठाण भागाला महापुराने वेढा घातल्याने नागरिकांमध्ये एकच तारांबळ उडाली होती. धाडी नदीने व लेंडी नाल्याला आलेल्या पुराने मोठमोठ्या लाटा ओसंडत होत्या. धाडी नदी व बेलवाई नदीला आलेल्या पुराचे पाणी इस्लामपुरा भागातील शंभर सव्वाशे घरांमध्ये शिरले तर लेंडी नाल्याला आलेल्या पुराचे पाणी दक्षिणेस असलेल्या पाठणवाडी भागाखालील रहिवासी वस्तीमध्ये जवळपास २५ घरांमध्ये शिरल्याने अनेकांचे संसारोपयोगी वस्तूंचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
या रहिवाशांच्या मदतीसाठी सामाजिक कार्यकर्ते व तरुण धावून आले होते. नुकसानीचे पंचनामे करून मदत मिळण्याची मागणी होत आहे. आज फैजपूर शहराचा आठवडे बाजार बंद होता. याचबरोबर छत्री चौक ते सुभाष चौकापर्यंत अंकलेश्वर-बऱ्हाणपूर महामार्गावर लेंडी नाल्याचे पाणी आल्याने काही वेळ वाहतुकीसाठी अडचणी येत होत्या.
इस्लामपुरा व पाठणवाडी परिसराव्यतिरिक्त इतर ठिकाणी कोणतेही नुकसान झाले नसल्याची माहिती आहे. दुपारनंतर मात्र पावसाने विश्रांती घेतली होती.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
धाडी नदीच्या पुरामुळे लक्कडपेठजवळील पुलावरून पुराचे पाणी वाहत असल्याने नागरिकांनी या पुलावरून वापरू नये, यासाठी पालिकेकडून नागरिकांना दक्षता घेण्याची जाहीर दवंडी शहरात देण्यात आली आहे. तरी नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
२०१६ नंतर महापूर पुर
सन १९९६ व २००६ मध्ये असे दोन वेळा धाडी नदी व बेलवाई नाल्याला महापूर आल्याने त्यावेळी इस्लामपुरा भागातील घरांमध्ये शिरले होते. या दोन्ही महापुरांनी नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचा या भागातील नागरिकांनी घेतला असून, आता तब्बल सतरा वर्षांनी आज या दोन्ही नद्यांना महापूर आल्याने आणखी इस्लामपुरा भागातील घरांमध्ये शिरल्याने नागरिकांचे संसारोपयोगी वस्तूंचे नुकसान झाले आहे.
अनेक वर्षानंतर लेंडी नाल्याला महापूर
न्हावी गावाकडून आलेल्या लेंडी नाल्याला पावसाळ्यात शेतांमधून वाहून येणारे पाणी येते. मात्र आज या लेंडी नाल्याच्या पुराचा जोर इतक्या मोठ्या प्रमाणात होता की न्हावी गाव, फैजपूर शहर व खंडोबा वाडीपासून गेलेल्या लेंडी नाल्यात अक्षरश: लाटा उसळत होत्या. त्यामुळे सरदार वल्लभभाई व्यापारी संकुलालगत पाठणवाडी खालचा भाग संपूर्ण जलमय झाला होता.
तर प्रथमच बेलवाई नाल्याचे पुराचे पाणी कळमोदाकडून फैजपूर शहराकडे वाहून आल्याचा पहिलाच प्रसंग होता. दरम्यान, इस्लामपुरा भागात पूरग्रस्तांना डॉ. दानिश अहमद यांच्याकडून जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. तर प्रभाग नगरसेवक शेख कुर्बान यांनी पाहणी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.