Jalgaon News : घरगुती सिलिंडरची वाहतूक होणार ठप्प?
Jalgaon News : भारत पेट्रोलियम अंतर्गत घरगुती गॅस सिलिंडर लोडिंग-अनलोडिंगचे काम करणाऱ्या कामगारांच्या वेतन कराराचे सहा वर्षांपासून नूतनीकरण न झाल्यामुळे कामगारांवर अन्याय होत असून, सर्व कामगार १५ मेपासून संपावर जाणार आहेत. त्यामुळे जळगाव जिल्ह्यात गॅस सिलिंडर वाहतुकीचा बोजवारा उडण्याची शक्यता आहे. (Gas cylinder loading unloading workers will go on strike over non renewal of wage contract jalgaon news)
या कामबंद आंदोलनाबाबत जळगाव जिल्हा माथाडी कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले आहे.
संघटनेचे सदस्य माथाडी मंडळात नोंदणीकृत कामगार असून, माथाडी मंडळाच्या माध्यमातून गेल्या १७ वर्षांपासून भारत पेट्रोलियम एमआयडीसीतील प्रकल्पात घरगुती सिलिंडर लोडींग-अनलोडींगचे काम करतात. भारत पेट्रोलियममध्ये माथाडी कायदा लागू आहे.
सहा वर्षांपासून करार नाही
माथाडी नियमानुसार कामगारांच्या वेतनवाढीबाबत दर तीन वर्षांनी करार करण्याचा नियम आहे. भारत पेट्रोलियममध्ये सिलिंडर वाहतूक करणारे ट्रक ठेकेदार यांच्यासोबत हा करार केला जातो. मात्र, गेल्या सहा वर्षांपासून कामगारांच्या वेतनवाढीच्या कोणताही करार झालेला नाही.
हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार
बैठकीत मक्तेदार आलेच नाही
याबाबत संघटनेमार्फत माथाडी मंडळाला पत्र दिले असता, माथाडी मंडळाने ट्रक ठेकेदार व कामगारांची बैठक मंगळवारी (ता. २) आयोजित केली होती. त्या बैठकीला ठेकेदार उपस्थित राहिले नाहीत. माथाडी नियमानुसार भारत पेट्रोलियम हे प्रिन्सिपल ओनर आहेत. त्यामुळे या गंभीर विषयात त्यांनी पुढाकार घेऊन मार्ग काढायला हवा. मात्र, कंपनीही टाळाटाळ करीत आहे.
कामबंदचा इशारा
प्रचंड वाढलेला महागाईमुळे सहा वर्षांपूर्वीच्या वेतनावर कामगारांना काम करणे परवडणारे नाही. त्यामुळे भारत पेट्रोलियममधील सिलिंडर लोडींग-अनलोडींगचे कामबंद करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.
...तर भारत पेट्रोलियम जबाबदार
कामबंददरम्यान भारत पेट्रोलियमने कोणतेही बाहेरचे कामगार आणू नये. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. त्याला भारत पेट्रोलियम जबाबदार राहील, असेही निवेदनात म्हटले आहे. संघटनेचे अध्यक्ष ॲड. जमील देशपांडे यांच्या नेतृत्वात हे निवेदन देण्यात आले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.