Gas Cylinder Safety Tips : गॅस सिलिंडर वापरताना दक्षता महत्त्वाची; गृहिणींनो, अशी घ्या काळजी...

gas cylinder
gas cylindersakal
Updated on

Gas Cylinder Safety Tips : एलपीजी गॅस सिलिंडर वापरण्यासाठी सुरक्षितता महत्त्वाची असून, नेहमी आयएसआय मार्क असलेल्या एलपीजी सिलिंडरचा वापर करा. अधिकृत विक्रेत्यांकडून गॅस सिलिंडर खरेदी करत असल्याची खात्री करा.

वितरणाच्या वेळी गॅस सिलिंडर स्वीकारताना, सिलिंडर योग्यरित्या सील केली जाते आणि त्याची सुरक्षा कॅप छेडछाड केलेली नाही याची खात्री करा, ज्यामुळे एलपीजीची गळती होऊन मोठ्या प्रमाणात विस्फोट होऊ शकतो, अशा महत्त्वपूर्ण टिप्स भारत पेट्रोलियमचे अधिकारी कमलेशकुमार यांनी पारोळा येथील कार्यशाळेत दिल्या.

किसान कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय पारोळा येथे भारत पेट्रोलियम भारत सरकार, मानस गॅस एजन्सी, तामसवाडी आणि राष्ट्रीय सेवा योजना विभाग किसान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. (Gas Cylinder Safety Tips jalgaon news)

या कार्यशाळेला मार्गदर्शन करण्यासाठी भारत पेट्रोलियमचे अधिकारी कमलेशकुमार आणि पवन भारती हे उपस्थित होते. यावेळी कमलेश कुमार यांनी एलपीजी गॅस सिलिंडर व त्याच्या घरगुती वापरामुळे अपघात कसे होतात, याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

यावेळी बोलताना त्यांनी सांगितले, की गॅस वापरणे जितके सहज तितकेच त्याच्यापासून अपघात सुद्धा जास्त होऊ शकतात. त्यामुळे गॅस सिलिंडरसोबत खेळ करू नका, कोणत्याही कारणाने गॅस बाहेर आल्यास त्याचा वेग हा २५० पट असतो. त्यामुळे अपघाताची शक्यता व त्यामुळे होणारे नुकसान हे अधिक असते.

गॅस सिलिंडरमध्ये एलपीजी वायू हा दोन टक्के आणि हवा ९८ टक्के असते. त्यामुळे रात्री झोपताना रेग्युलेटर बंद करणे आवश्यक आहे. जर रेग्युलेटर बंद केले नाही, तर गॅस हळूहळू लिक होतो. त्यामुळे प्रत्येकाने काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी स्वयंसेवकांना केले.

जिल्हा परिषद सदस्य रोहन सतीश पाटील यांनी पुढील काळात एनएसएस स्वयंसेवकांना अधिक प्रशिक्षण आणि तांत्रिक सहाय्य देणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी किसान महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. जी. एच. सोनवणे होते.

(लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर फक्त एका क्लिकमध्ये)

gas cylinder
Gas Cylinder Price: सणासुदीत सरकारचं आणखी एक गिफ्ट! व्यावसायिक सिलेंडच्या दरात मोठी कपात, किती झाला स्वस्त?

कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी डॉ. प्रदीप औजेकर यांनी केले. डॉ. अनिता मुडावदकर यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वितेसाठी प्रा. के. एस. गायकवाड यांनी परिश्रम घेतले. पुढील काळामध्ये भारत पेट्रोलियमार्फत किसान महाविद्यालयातील स्वयंसेवकांना आपत्ती व्यवस्थापन संबंधी एक दिवसीय प्रशिक्षण आणि सोबतच एलपीजीच्या प्लांटला भेट देता येणार आहे.

भारत पेट्रोलियममार्फत घेण्यात आलेल्या या शिबिराचे किसान विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष माजी पालकमंत्री डॉ. सतीश पाटील, प्राचार्य डॉ. वाय. व्ही. पाटील, रासेयो संचालक डॉ. सचिन नांद्रे यांनी कौतुक केले.

...गृहिणींनो, अशी घ्या काळजी

एकदा प्राप्त झाल्यानंतर, गॅस सिलिंडर योग्य हवेशीर जागेत एका सपाट पृष्ठभागावर उभ्या स्थितीत ठेवा. ज्यामुळे विस्फोट होऊ शकतो, अशी कोणतीही ज्वलनशील सामग्री आणि इंधन (जसे की रॉकेल) गॅस सिलिंडरजवळ नाही याची खात्री करा. गॅस सिलिंडर कनेक्ट करण्यासाठी सर्व्हिस मॅन किंवा डिलिव्हरी मॅनकडून मदत घ्या जेणेकरून ते काळजीपूर्वक आणि योग्यरित्या फिट केले जाईल.

कोणत्याही अपघाती गळती टाळण्यासाठी वापरानंतर गॅस सिलिंडरचे नॉब नेहमीच बंद करा. जर तुम्हाला गॅसचा वास येत असेल तर सर्व स्टोव्ह नॉब बंद करा. गॅस सिलिंडरमधून होणाऱ्या गॅस गळतीमुळे कोणतेही अपघात टाळण्यासाठी तुमच्या किचनमध्ये आणि खोलीमध्ये गॅस डिटेक्टर इंस्टॉल करा.

gas cylinder
Commercial Gas Cylinder : व्‍यावसायिक सिलिंडर १५८ रुपयांनी स्वस्त; नवे दर काय?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.