Jalgaon News : शेतकऱ्यांच्या कापसाला चांगला भाव द्यावा, या मागणीसाठी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला जागे करण्यासाठी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गुरुवारी (ता. १५) ‘जागरण गोंधळ’ करण्यात आला.
युवक जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांचे उपोषण सुरूच होते. शेतकऱ्यांच्या कापूस व शेतमाला चांगला भाव द्यावा, या मागणीसाठी राष्ट्रावादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. सरकारचा निषेध करण्यासाठी जागरण गोंधळ करण्यात आला. (get price for cotton Ravindra Patil indefinite hunger strike continues Support of Congress too Jalgaon News)
शेतकरी, नागरिक, पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते, समर्थक उपस्थित होते. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील व त्यांच्या पत्नी अश्विनी पाटील यांनी जागरण गोंधळाचे पूजन केले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा संघटक सचिव प्रा. डॉ. सुनील नेवे, राष्ट्रवादी युवकचे जिल्हा कार्याध्यक्ष दीपक पाटील, रावेर बाजार समितीचे सभापती सचिन रमेश पाटील, जळगाव बाजार समितीचे उपसभापती राजेंद्र पाटील, भुसावळ तालुकाध्यक्ष अतुल चव्हाण, संचालक अरुण पाटील, गटप्रमुख लक्ष्मण सपकाळे, युवकचे जिल्हा सरचिटणीस श्रीकांत चौधरी, चेतन पाटील, जीवन बोरनारे, राष्ट्रवादी युवकचे यावल तालुकाध्यक्ष देवकांत पाटील, विनोद पाटील, किशोर माळी, नरेंद्र शिंदे, भुसावळ युवक शहराध्यक्ष रणजित चावरिया, कार्याध्यक्ष विशाल ठोके, सिद्धार्थ सपकाळे, विजय भंगाळे, मिलिंद उंबरकर आदी उपस्थित होते.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.