Gharkul Scam News : दोषी 48 माजी नगरसेवकांकडून वसुली करावी; मनपा लेखा परिक्षक विभागाचे बांधकाम विभागास पत्र

 Gharkul tender scam
Gharkul tender scamsakal
Updated on

Gharkul Scam News : घरकुल घोटाळ्यात उच्च न्यायालयाने दोषी ठरविलेल्या व लेखा परिक्षणात ठपका ठेवून ४८ माजी नगरसेवकाकडील थकबाकी रक्कम सामुहिकरित्या ५९ कोटी व प्रत्येकी १कोटी १६ लाख रूपये जबाबदारी निश्‍चीत केलेली आहे.

ही रक्कम वसुल करण्याबाबत नोटीस बजावून पुढील कारवाई बांधकाम विभागाच्या शहर अभियंत्यांनी करावी, असे आदेश मुख्य लेखापरिक्षकांनी बजावले आहेत. त्याबाबत आता शहर अभियंता काय कारवाई करणार याकडे लक्ष लागून आहे. (gharkul scam Recovery should be made from guilty 48 ex Corporators Letter from Municipal Accounts Auditor Department jalgaon news)

जळगाव महापालिकेच्या घरकुल घोटाळा प्रकरणात माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल नाटेकर यांनी जनमाहिती अधिकारी, घरकुल वसुली विभाग यांच्याकडे अर्ज केला होता. त्यात त्यांनी, उच्च न्यायालयाने वकिलामार्फत घरकुल घोटाळ्यात दोषी असलेल्या व लेखा परिक्षणाचा ठपका ठेवून ४८ माजी नगरसेवकांकडे महापालिकेची सामुहिकरित्या ५९ कोटी रूपये म्हणजेच प्रत्येकी १ कोटी १६ लाख रूपये जबाबदारी निश्‍चीत केलेली आहे.

त्या अनुषंगाने बजावलेल्या नोटीसीबाबत कुणावर पात्र रक्कम वसुलीची जबाबदारी निश्‍चीत करण्यात आलेली आहे? नोटीसींच्या आजच्या स्थितीबाबत काय कारवाई केली? तसेच रक्कम वसुलीबाबत आयुक्त म्हणून कोणत्या उपाययोजना केल्यात? याबाबत माहिती द्यावी, अशी मागणी केली होती.

माहिती अधिकार कायद्यांतर्गत करण्यात आलेल्या अर्जाला महापालिकेतर्फे प्रथम अपिलीय अधिकारी तथा महापालिका मुख्य लेखापरिक्षक मारूती मुळे यांनी लेखी उत्तर दिले आहे. याबाबत त्यांनी म्हटले आहे की, घरकुल प्रकरणात ज्या माजी नगरसेवकांना नोटीस बजावण्यात आल्या त्यासंदर्भात संबधित विभागाने कारवाई करावी, असे पत्र मनपा बांधकाम विभागाच्या शहर अभियंत्यांना देण्यात आले आहे. त्यानुसार ते या प्रकरणात पुढील कारवाई करतील.

 Gharkul tender scam
Jalgaon Crime News : संगणकीय चक्री जुगारावर छापा; सिंधी कॉलनीत पोलिसांची कारवाई

शहर अभियंत्यांना पत्र प्राप्त

दरम्यान, याबाबत शहर अभियंता चंद्रकांत सोनगिरे यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले की, मुख्य लेखा परिक्षकांनी पाठविलेले ४८ माजी नगरसेवकांकडील वसुलीबाबत कारवाईचे पत्र नुकतेच टपालाद्वारे प्राप्त झाले आहे. त्यानुसार माहिती घेवून आपण त्याला उत्तर देणार आहोत.

हे आहेत माजी नगरसेवक

महेंद्र तंगु सपकाळे, अशोक काशिनाथ सपकाळे, चुडामण शंकर पाटील, अफजलखान रऊफखान पटवे, शिवचरण कन्हैयालाल ढंढोरे, चंद्रकांत बळीराम सोनवणे, सरस्वती रामदास कोळी, चंद्रकांत उर्फ आबा शंकर कापसे, विजय रामदास वाणी, अलका अरविंद राणे, पुष्पा प्रकाश पाटील, डिंगबर दौलत वाणी, लक्ष्मीकांत तुकाराम चौधरी, अजय राम जाधव, वासुदेव परशुराम सोनवणे, सुभद्राबाई सुरेश नाईक, इकबालोद्दीन पिंजारी, शांताराम चिंधू सपकाळे, देविदास बळीराम धांडे, भगत रावलमल बालाणी, चत्रभुज सोमा सोनवणे, दत्तु देवराम कोळी, डिगंबर दलपत पाटील, कैलास नारायण सोनवणे,

अशोक रामदास परदेशी, शालीग्राम मुरलीधर सोनवणे, लिलाधर नथ्थू चौधरी, गुलाबराव बाबुराव देवकर, पांडुरंग रघुनाथ काळे, लता रणजीत भोईटे, मंजुळा धर्मेंद्र कदम, निर्मला सूर्यकांत भोसले, विमल बुधो पाटील, साधना राध्येश्‍याम कोगटा, सुधा पांडूरंग काळे, सिंधू विजय कोल्हे, अलका नितीन लढ्ढा, मुमताजबी हुसेनखान, सुनंदा रमेश चांदेलकर, मीना अमृतराज मंधान, रेखा चत्रभुज सोनवणे, भागिरथी बुधो सोनवणे, मीना अनिल वाणी, पुष्पलता शालीग्राम अत्तरदे, विजय पंडीतराव कोल्हे, सदाशिक गणपत ढेकळे, प्रदीप ग्यानचंद रायसोनी.

 Gharkul tender scam
Jalgaon Crime News : शासकीय आवारातून वाळूचा ट्रॅक्टर पळविला; सहाय्यक तलाठी यांना धक्काबुक्की करुन चालक पसार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com