Gharkul Scheme Case : 2 वर्षांहून अधिक शिक्षा, 4 नगरसेवक अपात्र

Gharkul
Gharkulesakal
Updated on

Gharkul Scheme Case : तत्कालीन पालिकेने राबविलेल्या घरकुल योजनेतील (Jalgaon News) कथित गैरव्यवहार प्रकरणात दोन वर्षांपेक्षा जास्त शिक्षा झालेल्या पाच नगरसेवकांना अपात्र ठरविण्यासंदर्भात पालिकेने कोणत्याही प्रकारची कारवाई न केल्याने त्याविरोधात दाखल याचिकेत सत्र न्यायालयानेच आता यापैकी चार नगरसेवकांना अपात्र ठरविले आहे. (Gharkul scheme malpractice case More than 2 years imprisonment 4 corporator disqualified jalgaon news)

अर्थात, त्यापैकी भगत बालाण यांनी याआधीच राजीनामा दिला आहे. जळगाव पालिकेने झोपडपट्टीवासियांसाठी राबविलेल्या घरकुल योजनेत कोट्यवधींचा गैरव्यवहार झाल्याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात २००६ मध्ये तत्कालीन नगराध्यक्ष, नगरसेवक, अधिकारी, वास्तुविशारद व मक्तेदार यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला. या गुन्ह्याचा खटला अनेक वर्षे चालून धुळे येथील विशेष न्यायालयाने सर्व संशयितांना शिक्षा सुनावली.

पाच नगरसेवकांविरुद्ध अपात्रतेची तक्रार

दोन वर्षे अथवा त्यापेक्षा जास्त शिक्षा सुनावण्यात आलेल्या पालिकेच्या विद्यमान सभागृहातील दत्तात्रय (दत्तू) कोळी, भगत बालाणी, कैलास सोनवणे, सदाशिव ढेकळे, लता भोईटे या पाच नगरसेवकांना अपात्र ठरविण्याची मागणी करणारी तक्रार शिवसेना नगरसेवक प्रशांत नाईक यांनी महापालिका आयुक्तांकडे दाखल केली होती.

यापैकी दत्तू कोळी यांच्या घरकुल प्रकरणातील शिक्षेला स्थगिती मिळाल्याने त्यांचे नाव यात तक्रारीतून वगळण्यात आले. या तक्रारीत आयुक्तांनी त्यावर कोणताही निर्णय दिला नाही.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

Gharkul
Sakal Impact : ‘मेगा रिचार्ज’बाबत दोघा मुख्यमंत्र्यांची लवकरच बैठक

न्यायालयात याचिका

त्यामुळे श्री. नाईक यांनी याविरोधात जळगाव येथील दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर यांच्याकडे याचिका दाखल केली.

२०२१मध्ये कोरोनामुळे या याचिकेवरील सुनावणी लांबली. अखेरीस गुरुवारी (ता. १३) न्यायाधीश सय्यद यांच्या न्यायालयात सुनावणी पूर्ण होऊन यातील कैलास सोनवणे, भगत बालाणी, सदाशिव ढेकळे व लता भोईटे या चारही नगरसेवकांना अपात्र ठरविण्यात यावे, असे आदेश न्यायालयाने महापालिका आयुक्तांना दिले आहेत, अशी माहिती या याचिकेत नाईक यांच्यातर्फे काम पाहणारे ॲड. सुधीर कुळकर्णी यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली. महापालिकेतर्फे ॲड. अमोल मुजुमदार व नगरसेवकांतर्फे ॲड. प्रदीप कुळकर्णी यांनी युक्तिवाद केला.

आता पुढे काय?

पाच जणांविरोधात अपात्रतेची याचिका प्रलंबित होती. पैकी दत्तू कोळी यांच्या शिक्षेला स्थगिती मिळाली असल्याने त्यांचा यात समावेश नाही. तर भगत बालाणी यांनी याआधीच आपल्या नगरसेवकपदाचा राजीनामा दिला आहे.

Gharkul
Jalgaon News : तयार रस्त्यांवर 55 ठिकाणी मनपाकडून खोदकाम! मक्तेदाराकडून 30 वेळा पत्रव्यवहार

ज्या अन्य नगरसेवकांना अपात्र केले आहे, ते या निर्णयाविरोधात वरच्या न्यायालयात अपील करण्याची शक्यता अधिक आहे. अर्थात, तसे केले नाही, तर ते पुढची निवडणूक लढण्यासाठीही अपात्र ठरू शकतील.

"न्यायालयावर पूर्ण विश्‍वास होता. घरकुल प्रकरणात या नगरसेवकांना दोन वर्षांपेक्षा अधिक शिक्षा झाल्याने त्यांनी नैतिकतेच्या आधारे राजीनामा द्यायला हवा होता. मात्र, अखेरीस न्यायालयाने न्याय केला, याचे समाधान आहे." -प्रशांत नाईक, याचिकाकर्ता

"या प्रकरणात दत्तू कोळी यांच्या शिक्षेला स्थगिती मिळाली आहे. त्यामुळे त्याच धर्तीवर नैसर्गिक न्याय तत्त्वावर आमच्या शिक्षेलाही स्थगिती मिळणे अपेक्षित आहे. त्यामुळे न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात वरच्या न्यायालयात अपील करण्यात येईल." -कैलास सोनवणे

Gharkul
Jalgaon News : महामार्गावर दर्शनी भागात वेग मर्यादेचे फलक लावावे : जिल्हाधिकारी मित्तल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.