Girish Mahajan News : वैद्यकीय संकुलाची इमारत दीड वर्षात होणार पूर्ण : गिरीश महाजन

Minister Girish Mahajan
Minister Girish Mahajanesakal
Updated on

Girish Mahajan News : भारतातील एकमेव शासकीय वैद्यकीय संकुल म्हणून जळगावात ‘मेडिकल हब’ला मान्यता मिळणे ही मोठी उपलब्धी होती. (girish mahajan statement about building of the medical complex will be completion jalgaon news)

या वैद्यकीय संकुलाच्या प्रस्तावित इमारतीसाठी जागाही निश्‍चित असून, लवकरच भुमिपूजन होऊन दीड वर्षात ही इमारत उभी राहील, असा विश्‍वास राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी व्यक्त केला.

वैद्यकीय संकुलाच्या कामाबाबत श्री. महाजन यांच्याशी संवाद साधला असता ते ‘सकाळ’शी बोलत होते. तत्कालीन फडणवीस सरकारच्या काळात आपण या विषयाचा जातीने पाठपुरावा करुन जळगावसाठी शासकीय वैद्यकीय संकुल मंजूर करुन घेतले. त्यासाठी त्या वेळी साडेसहाशे कोटींची तरतूद करुन सध्या अस्तित्वात असलेल्या जिल्हा सामान्य रुग्णालयातच वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यात आले.

देशातील एकमेव उदाहरण

पहिल्या टप्प्यात पदवी अभ्यासक्रम सुरु होऊन मावळत्या वर्षात या संकुलातून एमबीबीएसची पहिली बॅच बाहेर पडली. नंतरच्या टप्प्यात अन्य अभ्यासक्रम सुरु करण्यात आले. एकाच छताखाली एमबीबीएस, होमिओपॅथी, आयुर्वेद, नर्सिंग, युनानी, पॅथॉलॉजी अशा विविध अभ्यासक्रमांचे शासकीय संकुल म्हणून हे भारतातील एकमेव उदाहरण आहे.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

Minister Girish Mahajan
Chandrasekhar Bawankule : सातपूर बसस्थानक महत्त्वाचे केंद्र ठरेल : चंद्रशेखर बावनकुळे

सोळाशे कोटींचा प्रकल्प

सध्या जिल्हा सामान्य रुग्णालयात हे संकुल सुरु असले, तरी त्यासाठी चिंचोली शिवारात ४० एकर जागा निश्‍चित करण्यात आली आहे. प्रस्तावित इमारतीचे नियोजनही झाले आहे. लवकरच या इमारतीचे भूमिपूजन होऊन दीड वर्षात ती पूर्ण करण्याचा आपला निर्धार आहे, असेही महाजन म्हणाले.

‘पदव्युत्तर’च्या जागा

या वैद्यकीय संकुलात नुकत्याच पदव्युत्तर म्हणजे ‘एमडी’च्या १४ जागांनाही मान्यता मिळाली आहे. त्यामुळे वैद्यकीय अभ्यासक्रमातील पदव्युत्तर शिक्षणही आता जळगावातच उपलबध होणार असून ही आपल्या दृष्टीने मोठी उपलब्धी आहे.

ठाकरे सरकारने रोखले काम

फडणवीस सरकारच्या काळात मंजूर वैद्यकीय संकुलाचे काम राज्यात ठाकरेंचे सरकार आल्यानंतर थांबले. त्या तीन वर्षांत या संकुलाला एक दमडीचाही निधी मिळाला नाही. त्यामुळे प्रस्तावित इमारतीचे कामही सुरु होऊ शकले नाही.

Minister Girish Mahajan
Sharad Pawar : कामगारांचे ऐक्य हेच चळवळीच्या यशाचे सूत्र : शरद पवार

पाच हजार विद्यार्थ्यांची स्ट्रेंग्थ

या वैद्यकीय संकुलात विविध अभ्यासक्रमांच्या विविध वर्षांचे मिळून एकाचवेळी पाच हजारांवर विद्यार्थी शिक्षण घेतील. महाविद्यालयाचा शिक्षक, प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी वृंद असा जवळपास १० हजारांचा लवाजमा या संकुल परिसरात कार्यरत असेल. त्या माध्यमातून जळगावातील जवळपास दोन-चार हजार लोकांना वेगवेगळ्या स्वरुपाचा रोजगारही उपलब्ध होणार आहे.

५० हजार हेक्टर जमिनीचे सिंचन

सिंचनातून समृद्धीचा संकल्पही आपण फडणवीस सरकारच्या कार्यकाळातच हाती घेतलांय. वाघुर धरणातून परिसरातील गावखेड्यांना शेतीसाठी पाणी उपलब्ध करुन दिले जाईल. वाघुर धरणातून जलवाहिनीद्वारे शेतीपर्यंत पाणी तसेच परिसरात ४१०० शेततळ्यांचे जाळे निर्माण करण्यासाठी योजना राबविण्यात येत असून त्याचा पाठपुरावा सुरु आहे. जवळपास ३५ ते ४० गावांना त्याचा लाभ होऊन किमान ५० हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली येईल, असे श्री. महाजन म्हणाले.

Minister Girish Mahajan
Jalgaon News : नोबेल सायन्स टॅलेंट सर्च परीक्षेद्वारे गुणवंत विद्यार्थी जाणार इस्रोला; येथे करा अर्ज

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com