Girish Mahajan News : केळी उत्पादकांना पीक विम्याची भरपाई : गिरीश महाजन

Girish Mahajan News
Girish Mahajan Newsesakal
Updated on

Girish Mahajan News : जळगाव जिल्ह्यातील केळी पीक विमा काढलेल्या सर्वच केळी उत्पादक शेतकऱ्यांना पीक विम्याची भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी ई पीक पाहणीचा पेरणी अहवाल अंतिम धरून विमा नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. (Girish Mahajan statement about Crop Insurance Compensation to Banana Growers jalgaon news)

आज कृषी आयुक्तांशी चर्चा करून विम्याची भरपाई केळी उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार आहे. भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष हभप ज्ञानेश्वर जळकेकर यांनी संयुक्त बैठक आयोजित करून विषय मार्गी लावला असल्याची माहिती जिल्हा दूध संघाचे संचालक अरविंद देशमुख यांनी ‘सकाळ’ ला दिली.

८७ हजार हेक्टर्स क्षेत्रावरील केळीची तत्काळ मंजुरी (Approval) देण्याच्या जिल्हा प्रशासन व कृषी विभागाच्या विमा कंपनीस लेखी सूचना देण्यात आल्याचे देशमुख यांनी सांगितले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Girish Mahajan News
Jalgaon Farmer Protest : अंगावर बांधली केळी अन्‌ पानेही; केळी पिक विम्याबाबत केळीच्या पानावर निवेदन

नुकसान भरपाई तत्काळ जमा न केल्यास १२ टक्के विलंब शुल्क देण्याची मागणीही आज झालेल्या बैठकीत मान्य करण्यात आली.

बैठकीस आपत्ती व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आर. बी. चलवदे, भाजप जिल्हाध्यक्ष हभप ज्ञानेश्वर महाराज जळकेकर, दूध संघाचे संचालक अरविंद देशमुख, भाजप तालुका अध्यक्ष गोपाल भंगाळे, मिलिंद चौधरी,किशोर चौधरी, हर्षल चौधरी, भाऊसाहेब पाटील, डॉ.सत्वशील पाटील, गजानन सोनवणे, तंत्र अधिकारी गणपतराव घोंगडे, विमा कंपनी जिल्हा प्रतिनिधी राहुल पाटील आदी उपस्थित होते.

Girish Mahajan News
Girish Mahajan : संकटमोचक गिरीश महाजन शिष्टाईत नेहमी यशस्वी कसे ठरतात? वाचा सविस्तर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.