Girish Mahajan News : जिल्हा दुध संघात आम्ही तिनही मंत्री, आमदार राजकारण करायला आलो नाहीत. तर दुध संघाच्या, पर्यायाने शेतकऱ्यांच्या विकासासाठी आलो आहोत. दुध संघ कमर्शिअल करून त्यात विविध पदार्थांची निर्मिती व विक्रीसाठी प्रयत्न सुरू आहेत.
दुध संघाला पहिल्या पाचमध्ये आणण्याचा दोन वर्षात प्रयत्न करू. दुध उत्पादकांनी दुधात भेसळ करू नये, तसे आढळल्यास गुन्हे दाखल करू, असा इशारा ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी येथे दिला.
जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघाची ५२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी (ता. २४) क्रेझी होम येथे झाली. त्यावेळी ते बोलत होते. (girish mahajan statement about district milk union jalgaon news)
संघाचे चेअरमन आमदार मंगेश चव्हाण, जिल्हा बँकेचे चेअरमन संजय पवार, संचालक दिलीप वाघ, संचालक रोहित निकम, मधुकर राणे, नितीन चौधरी, संचालिका छाया देवकर, डॉ. पूनम पाटील, शामल झांबरे, संचालक अरविंद देशमुख, प्रभारी कार्यकारी संचालक शैलेश मोरखडे आदी उपस्थित होते.
मंत्री महाजन म्हणाले की, आम्हाला दुध संघातून एक रूपयाही नको आहे. यामुळे सभासदांचे सर्वानुमते जे निर्णय होतील, ते आम्ही मान्य करू. म्हणूनच सभासदांचे काही प्रश्न, सूचना आम्ही मांडू दिल्या. पश्चिम महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी सहकारी दुध सोसायट्या आहेत. सहकारातून शेतकऱ्याचा विकास तेथे झाला आहे.
त्याप्रमाणे जळगावला का नको? तो होण्यासाठी दुध संघात आलो. आम्हाला राजकारण करायचे नाही. प्रामाणिकपणे काम करून शेतकऱ्यांचा विकास कसा हाईल, त्यांचे जीवनमान कसे उंचावेल, त्यांना शेतीपूरक दूग्ध व्यवसाय करताना अडचण येणार नाही याची काळजी या माध्यमातून घेणार आहे.
जी जी मदत होईल, ते देण्याचा आमचा प्रयत्न असेल. दुधात भेसळीच्या अनेक घटना घडताहेत. दूधात भेसळ करून तूम्ही विष आपल्याच मुलाबाळांना विकताहेत. हे खपवून घेतले जाणार नाही. भेसळ करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करू. मग तो कोणीही का असेना.
खडसेंवर अप्रत्यक्ष टिका
मंत्री महाजन यांनी माजी मंत्री एकनाथ खडसेंवर टीका करण्याची संधी सोडली नाही. ते म्हणाले, आम्हाला दुध संघातून घरी लोणी, तूप न्यायचे नाही. असे प्रकार मागील संचालकांच्या काळात घडले आहेत. दुधाची पावडर, लोणी कोठे लपवून ठेवायचे नाही, की संघाच्या खर्चातून गाडीचे टायर बदलायचे नाहीत. ड्रायव्हरही ठेवायचा नाही. मागील प्रकार सांगायला भरपूर आहेत, पण मी सांगणार नाही.
मलाई खायला आलो नाही
पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, की दूध संघाची प्रगती करण्यासाठी आम्ही येथे आलो आहोत. दुध संघ तुमचा (सभासदांचा) आहे. आम्ही मंत्री आहे ते सोडा. जेव्हा वाटेल आमच्याकडून दुध संघात काही होत नाही, त्याच्या दूसऱ्या दिवशी राजीनामा देवू. तुम्ही आमच्यावर (नवीन संचालक मंडळावर) जो विश्वास दाखविला, त्याला तडा जावू दिला जाणार नाही. आम्ही येथे ‘मलाइ’ खायला आलो नाही.
आमची चूक असेल ती आम्ही दूरूस्त करू. चांगले झाले असेल, तर आम्हाला शाबासकी द्या. महिला बचत गटांचे कार्य चांगले आहे. ग्रामविकास मंत्री महाजन यांनी बचत भवनासाठी प्रत्येक महिला बचत गटाला पंधरा लाखांची मदत करावी. ते नक्कीच चांगले कार्य करतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.