Girish Mahajan: खडसेंनी टीका करण्यापेक्षा घ्यावी तब्येतीची काळजी; गिरीश महाजन यांचा टोला

Girish Mahajan News
Girish Mahajan Newsesakal
Updated on

Girish Mahajan : राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथ खडसे यांनी त्यांच्या तब्येतीची काळजी घेतल्यास राज्यातील सगळे प्रश्‍न सुटतील, असा टोला ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी बुधवारी (ता. २२) येथे लगावला.

सरकारच्या योजनांच्या जागर रथाला हिरवा झेंडा श्री. महाजन यांनी दाखवला. त्यावेळी ते बोलत होते. (Girish Mahajan statement Khadse should take care of health instead of criticizing jalgaon news)

श्री. महाजन म्हणाले, की श्री. खडसे यांना गौण खनिज प्रकरणी १३७ कोटींची नोटीस आल्याने त्यांनी मुख्यमंत्र्यांना फोन करून ‘एअर ॲम्बुलन्स'ने मुंबई येथील रुग्णालयात ते उपचारासाठी दाखल झाले.

असा कोणता हृदयविकाराचा झटका त्यांना आला? खोटी सोंगं करायची. उपचार घ्यायचे आणि परत इकडे येऊन आरोप करायचे. याला काय म्हणावे? त्यापेक्षा श्री. खडसे यांनी त्यांच्या तब्येतीची काळजी घ्यावी.

Girish Mahajan News
Eknath khadse on Girish Mahajan : मराठा आंदोलकांनी एकनाथ खडसेंची गाडी अडवताच महाजनांवर बरसले...

शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना श्री. महाजन म्हणाले, की राज्यात सरकार शेतकऱ्‍यांचे प्रश्‍न सोडवण्यासाठी समर्थ आहे. रघुनाथदादांचे आता वय झाले. त्यामुळे त्यांनी काय बोलावे हे त्यांनी ठरवावे.

रघुनाथदादा हे ज्येष्ठ आहेत त्यांनी अशा प्रकारची विधाने करू नयेत. कापसाला सद्यःस्थितीत आठ हजार रुपयांपर्यंत भाव आहे. यंदा उत्पादन कमी असल्याने आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील परिस्थितीमुळे त्याचा परिणाम जाणवत आहे.

Girish Mahajan News
Girish Mahajan: तरुणांमधील व्यसनाधीनता कर्करोगासाठी कारणीभूत; गिरीश महाजन यांचे प्रतिपादन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.