जळगाव : राज्यात पर्यटन विकासासाठी सरकार सकारात्मक असून, अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील पर्यटन क्षेत्र मागे कसे राहिले, यावर चिंतन करीत नव्याने सर्वसमावेशक पर्यटन धोरण आठवडाभरात मंजूर करण्यात येईल.
त्यादृष्टीने राज्याच्या सहा विभागांत शिवसृष्टीचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे ग्रामविकास तथा पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांनी दिली. (Girish Mahajan statement New tourism policy within week in maharashtra state jalgaon)
जळगावातील जिल्हा भाजप कार्यालयात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पर्यटन विकासाच्या संदर्भात संभाव्य योजना व प्रकल्पांबाबत आढावा घेताना श्री. महाजन म्हणाले, की पर्यटनाच्या क्षेत्रात कधीकाळी महाराष्ट्र अव्वल होता. मात्र, गेल्या काही वर्षांत तो मागे पडला.
त्यासंबंधी कारणांवर चिंतन सुरू आहे. अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील पर्यटन विकास वेगाने व्हावा म्हणून सरकार कार्यरत व कटिबद्ध असून, त्यादृष्टीने कसोशीने प्रयत्न सुरू आहेत.
चारशे तीर्थक्षेत्रांना ‘ब’ दर्जा
माझ्याकडे पर्यटन विभागाचा कारभार येऊन चार- पाच महिनेच झाले. मात्र, या काळातही काही चांगले निर्णय आम्ही घेतले.
राज्यातील जवळपास ४०० तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी त्यांना ‘ब’ वर्ग दर्जा दिला असून, त्यांच्या विकास निधीत अडीच पट वाढ करून तो दोन कोटींवरून पाच कोटी करण्यात आला आहे. आपल्या श्रीक्षेत्र पद्मालय, पाळधी येथील साईबाबा मंदिराचाही त्यात समावेश आहे.
लवकरच नवे पर्यटन धोरण
महाराष्ट्राला ७२० किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. हे क्षेत्र तसेच ज्याठिकाणी पाण्याचे मोठे स्रोत आहेत, अशी धरणे, तलाव व अन्य ठिकाणांचा पर्यटन क्षेत्र म्हणून विकास करायचा आहे.
अशा ठिकाणी नागरिक पर्यटनाला जाणे पसंत करतात, वॉटर स्पोर्टस्ची त्यांना अधिक आवड आहे. म्हणून अशा ठिकाणांसह जी ऐतिहासिक, प्राचीन स्थळे आहेत त्या सर्वांच्या विकासासाठी राज्यात नवे पर्यटन धोरण लवकरच म्हणजे पुढच्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर करण्यात येईल, असेही श्री. महाजन यांनी सांगितले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.