Girish Mahajan : "अमित ठाकरेंचे 'ते' वक्तव्य अत्यंत बालिश" : गिरीश महाजन

Girish Mahajan
Girish Mahajanesakal
Updated on

Girish Mahajan : सरकार आमदार फोडण्यात व्यस्त असल्यामुळे इर्शाळवाडीची दुर्घटना घडली, हे मनसे विद्यार्थी सेनेचे प्रमुख अमित ठाकरे यांचे वक्तव्य अत्यंत बालिश आहे.

असे वक्तव्य कोणीही करू नये, असे मत राज्याचे ग्रामविकासमंत्री व भाजप नेते गिरीश महाजन यांनी जळगाव येथे शनिवारी (ता. २२) व्यक्त केले. (girish mahajan statement on amit thackeray irshalwadi comment about bjp govt jalgaon news)

मंत्री गिरीश महाजन जळगाव दौऱ्यावर आहेत. कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठात ते युवा संवाद कार्यक्रमासाठी उपस्थित होते. या वेळी पत्रकारांशी ते बोलत होते. ते म्हणाले, की सरकार आमदार फोडण्यात व्यस्त असल्यामुळे इर्शाळवाडीची घटना घडली, हे अमित ठाकरे यांचे विधान अत्यंत बालिशपणाचे आहे, असेच म्हणावे लागेल.

कारण सरकार लक्ष ठेवून होते. धोकादायक क्षेत्राच्या यादीत इर्शाळवाडीचे नावही नव्हते, परंतु त्या ठिकाणी अचानक नैसर्गिक घटना घडली आहे. त्यामुळे या दुर्दैवी घटनेचे कुणीही राजकारण करू नये. अतिवृष्टी, जोरात हवा यामुळेच ही घटना घडली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Girish Mahajan
Irshalwadi Landslide: "इर्शाळवाडीतील मृतांची संख्या तीन आकडी असू शकते"; गिरीश महाजन सांगितला ग्राऊंड रिपोर्ट

मृतांची संख्या वाढण्याची शक्यता

इर्शाळवाडीच्या घटनेबाबत ते म्हणाले, या ठिकाणी मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्या ठिकाणी घरे वीस फूट खाली गाडली गेली आहेत. त्या ठिकाणी कोणतीही साधने पोचविणे शक्य नाही. त्यामुळे माणसातर्फेच काम करावे लागत आहे.

त्याठिकाणी मदतीचे काम करणेही कठीण होत आहे. त्यामुळे आता दोन दिवसांनी त्या ठिकाणचे काम थांबवावे लागणार आहे. माळीण येथे घडलेल्या घटनेप्रमाणे मृतांना काढणेही शक्य होणार नाही. त्यामुळे त्या ठिकाणी ते डिस्पोज करावे लागणार आहे. त्यामुळे कोण कोण दाबले गेले, याचा जागेवरच पंचनामा करण्यात येईल. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

अजितदादा मुख्यमंत्री आततायीपणा

राज्यात अजित पवार मुख्यमंत्री होणार असल्याचे बॅनर लागत आहे. याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, की असा आततायीपणा भाजप, राष्ट्रवादी कोणीही करू नये. एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यांच्याच नेतृत्वात २०२४ निवडणुका आम्ही लढविणार आहोत. त्यामुळे मुख्यमंत्री बदलाबाबत प्रश्नच येत नसल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.

Girish Mahajan
Amit Thackeray : सरकारच्या दुर्लक्षामुळे इर्शाळवाडीची घटनाच; अमित ठाकरेंचा आरोप

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.