Jalgaon News : अक्षय तृतीयेला वाढलेले सोने-चांदीचे दर महिन्याभरात घसरले आहेत. चांदीच्या दरात चार हजारांची, तर सोन्याच्या दरात ४१५ रूपयांची घसरण झाली आहे. सध्या मागणी नसली, तरी दर तेजीतच आहे.
शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची तयारी सुरू केली. मागील वर्षीचा कापूस योग्य दर न मिळाल्याने विकला गेला नाही. यामुळे शेतकरी घेतलेले सोने विकून त्याचा उपयोग खरीपाच्या तयारीला करीत असल्याचे चित्र आहे. (Gold silver rate Decline in a month Demand dropped Gold breaking rate increased Jalgaon News)
जळगाव जिल्ह्यातील पांढरे सोने म्हणून ‘कापूस’ ओळखले जाते. यंदा मात्र ‘सीसीआय’ने कापूस खरेदी सुरू केलेली नाही. दुसरीकडे खासगी व्यापारी कापसाला प्रतिक्विंटल साडेसात हजारांपेक्षा अधिक भाव देत नसल्याचे चित्र आहे.
गतवर्षीप्रमाणे यंदाही कापसाला दहा ते तेरा हजारांचा दर मिळेल, ही शेतकऱ्यांची आशा फोल ठरली आहे.
अनेकांनी दर मिळेल या आशेने कापूस घरात भरून ठेवला आहे. तो विकला न गेल्याने बँक, सोसायटीचे कर्ज फेडण्यासाठी शेतकरी आपल्या जवळील सोने मोडीत काढत असल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यात सरासरी तीन ते पाच किलो सोने मोडीस ग्राहक येत असल्याचे सराफ व्यावसायीकांनी सांगितले. सोने केव्हाही घेता येईल, मात्र खरीप हंगामातील पेरण्या चुकायला नको, त्या अनुषंगाने शेतकऱ्यांनी सोने विकून तयारी सुरू केली आहे.
सोन्यास सध्या चांगला दरही मिळत आहे. सध्या सोन्याला जीएसटीसह ६२ हजार ८३० प्रती तोळा रूपये दर मिळत असल्याने मोडणाऱ्यांस चांगला परतावा मिळत आहे. महिन्याभरापूर्वी सोने ६३ हजार २४२ प्रती तोळे होते.
आज ६२ हजार ८३० प्रती तोळे आहे. चांदीचा दर महिन्याभरापूर्वी ७९ हजार ८२५ (जीएसटीसह) होता. त्यात मात्र आता घसरण झाली आहे. ७५ हजार रूपये प्रती किलो चांदी मिळत आहे.
शहरासह ग्रामीण भागातील महिलांचा कल सोने खरेदीकडे वाढत आहे. अधिकतर ग्रामीण भागातील महिलांचा सोने खरेदीकडे अधिक कल असतो, तो गुंतवणूक म्हणून.
शहरी भागातील महिलाही गुंतवणूक आणि फॅशन म्हणूनही सोन्याकडे पाहतात. भारतातील एकूण सोन्याची वार्षिक मागणी ११०० ते १२०० टन एवढी आहे. त्यापैकी ५५ ते ६० टक्के खप हा ग्रामीण भागात होतो.
आगामी काही महिन्यात दर कमी अधिक होत जातील. मात्र लग्न सराई, शुभकार्य नसेल, तेव्हा सोने, चांदीची मागणी कमी होईल. तेव्हा दरात मोठी घसरण होण्याचा अंदाज सूवर्ण व्यावसायीक वर्तवित आहे.
गेल्या काही दिवसातील सोने, चांदीचे दर असे (विना जीएसटी)
तारीख सोने प्रती तोळे चांदी प्रती किलो
२८ जानेवारी ५७,४०० ६९०००
१ फेब्रुवारी ५७,४०० ६९०००
२६ फेब्रुवारी ५५,९०० ६५,५००
१० मार्च ५५,६०० ६३०००
१८ मार्च ५९,३०० ६९०००
१३ एप्रिल ६०,५०० ७५०००
१४ एप्रिल ६१,४०० ७७,५००
३० एप्रिल ६०,३०० ७७,५००
१० मे ६१,५०० ७७०००
२० मे ६१,००० ७३०००
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.