Gold Silver Rate Hike : अक्षय तृतीया, साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त. या दिवशी सोन्याची अधिक खरेदी होते. (Gold Silver Rate Hikes on occasion of akshaya tritiya jalgaon news)
हा मुहूर्त आठ दिवसानंतर येणार असला तरी आजच सोने कडाडले असून एक तोळा सोने आज ६३ हजार २४२ रुपयांवर पोचले आहे. चांदीतही एकाच दिवसात अडीच हजारांची वाढ होवुन चांदी ७९ हजार ८२५ (जीएसटीसह) रुपये झाली आहे.
सोने, चांदीमध्ये केलेली गुंतवणूक ही लागलीच रोकड देणारी मानली जाते. सोने, चांदीचे दागिने विकले की मिळालेल्या पैशांतून नागरिक आपली आर्थिक गरज पूर्ण करतात. यामुळे सोन्यात दर वर्षी गुंतवणूक वाढत आहे. केंद्रीय अंदाजपत्रकानंतर लागलीच दुसऱ्या दिवशी सोने, चांदीच्या दरात वाढ होवुन, सोने बाजारात उसळी आली होती.
चांदीच्या दरात प्रती तोळ्यामागे ८०० रुपयांची तर चांदीच्या दरात तब्बल तीन हजारांची वाढ झाली होती. महिन्यानंतर मात्र सोन्यात १५०० तर चांदीत ४ हजारांनी घसरण झाली होती. बजेटनंतर सोने, चांदीचे दर वाढतच जातील असे चित्र होते. मात्र अंदाजपत्रकानंतर दहा दिवसानंतर सोन्याचे दरात तसेच राहिले होते. मात्र चांदीच्या दरात तब्बल पाच हजारांची घसरण झाली होती.
हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत
नवीन वर्षात सोने, चांदी बाजारात तेजीचे वातावरण आहे. जानेवारीत सोन्याच्या दरात पंधराशे रुपयांची तर चांदीच्या दरात एक हजारांची वाढ झाली होती. तेव्हा सोन्याचा दर जीएसटी’सह ५८ हजार ८०० वर पोचला होता. चांदीचा दर ‘जीएसटी’ सह ७२ हजार १०० वर पोचला होता.
शहरासह ग्रामीण भागातील महिलांचा कल सोने खरेदीकडे वाढत आहे. अधिकतर ग्रामीण भागातील महिलांचा सोने खरेदीकडे अधिक कल असतो, तो गुंतवणूक म्हणून. शहरी भागातील महिलाही गुंतवणूक अधिक फॅशन म्हणून सोन्याकडे पाहतात. भारतातील एकूण सोन्याची वार्षिक मागणी ११०० ते १२०० टन एवढी आहे. त्यापैकी ५५ ते ६० टक्के खप हा ग्रामीण भागात होतो.
काल (ता.१३) सोन्याचा दर ६० हजार पाचशे प्रती तोळा (विना जीएसटी) होता. चांदी ७५ हजार रुपये प्रती किलो होती. आज सोन्याच्या दरात ९०० रुपयांची वाढ झाली. ‘जीएसटी’सह सोने ६३ हजार २४२ वर पोचले. काल चांदीचा दर ७५ हजार प्रती किलो होता. आज चांदीत अडीच हजारांची वाढ होवुन चांदी ७९ हजार ८२५ ‘जीएसटी’सह पोचली आहे.
गेल्या काही दिवसातील सोने, चांदीचे दर असे (विना जीएसटी)
तारीख--सोने प्रती तोळे--चांदी प्रती किलो..
२८ जानेवारी--५७ हजार ४००--६९ हजार
१ फेब्रुवारी -५७ हजार ४००--६९ हजार
२६ फेब्रुवारी--५५ हजार ९००--६५ हजार ५००
१० मार्च--५५ हजार ६००--६३ हजार
१८ मार्च--५९ हजार ३००--६९ हजार
१३ एप्रिल - ६० हजार ५००-- ७५ हजार
१४ एप्रिल--६१ हजार ४००--७७ हजार ५००
"जागतिक पातळीवर अमेरिकन फेडरल बँकांचे व्याज धोरण, अनेक बँका तोट्यात गेल्यानंतर गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्यात गुंतवणूक करीत आहेत. त्यामुळे सोन्याच्या मागणीत लक्षणीय वाढ झाली आहे. यामुळे दरवाढ होत आहे. आगामी काळातही वाढ होईल असे चित्र आहे." - सुशील बाफना, संचालक, आर.सी. बाफना ज्वेलर्स
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.