Jalgaon : विजयादशमीच्या पार्श्वभूमीवर सोने, चांदीत उसळी

Dasara 2022
Dasara 2022esakal
Updated on

जळगाव : विजयादशमीच्या पार्श्वभूमीवर आज (ता.४) सोने बाजाराने उसळी घेतली आहे. दोन दिवसांचा विचार केल्यास सोन्यात दरात पाचशेनी उसळी घेतली. चांदीच्या दरातही तीन हजारांची वाढ झाली आहे. सध्या लग्नसराईला अवकाश असला तरी विजयादशमीला सोन्याला प्रचंड मागणी असते. ती मागणी लक्षात घेता सोने, चांदीच्या दरात वाढ करण्यात आली आहे.

विजयादशमी हा साडेतीन मुहूर्तापेक्षा एक मुहूर्त आहे. त्यावर सोन्याच्या दागिन्यांची मोठी खरेदी होते. लवकरच दिवाळी, पाडवा, भाऊबीज यासारखे सण आहेत.(Gold silver Rates Hike Vijayadashami 2022 jalgaon news)

Dasara 2022
Make up tips : मस्करा सुकल्यास तो पुन्हा वापरता यावा यासाठी काय कराल ?

एक ऑक्टोबरला सोन्याचा दर ५१ हजार (प्रती तोळा) होता. चांदी ५९ हजार प्रतिकिलोचा दर होता. आज सोन्याचा दर ५१ हजार ५०० तर चांदीचा दर ६२ हजार आहे. सोन्याच्या दरात वाढ झाली तरी या मुहूर्तावर ग्राहकांची सोने खरेदीस गर्दी होणार असे सराफ व्यावसायिकांनी सांगितले.

सोने, चांदीचे दर असे (जीएसटी विना)

तारीख--सोने (प्रतितोळे)--चांदी (प्रतिकिलो)

१६ जून--५१ हजार २००--६४ हजार

२१ जून--५१ हजार ३००--६३ हजार ५००

२२ जून--५१ हजार--६२ हजार ५००

१५ ऑगस्ट--५३ हजार--६१ हजार

१६ ऑगस्ट--५२ हजार ५००--६० हजार

२२ ऑगस्ट--५२ हजार--५६ हजार ५००

३० सप्टेंबर--५१ हजार--५७ हजार ५००

१ ऑक्टोबर--५१ हजार---५९ हजार

४ ऑक्टोबर--५१ हजार ५००--६२ हजार

Dasara 2022
Jalgaon Crime : अघोरी शक्तीची भिती घालून दाम्पत्याची 11 लाखात लूट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.