Jalgaon : रेल्वेच्या जनरल श्रेणी तिकीटाला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद

Passengers purchasing general tickets
Passengers purchasing general ticketsesakal
Updated on

जळगाव : कोरोना महामारीमुळे (Corona) गेल्या सव्वादोन वर्षापासून रेल्वेत सर्वसामान्य श्रेणीच्या तिकिटावरील (General ticket) प्रवास रेल्वेने बंद केला होता. तो बुधवार (ता. २९)पासून पुन्हा रेल्वेतर्फे (Railway) सुरू करण्यात आला आहे. पहिल्याच दिवशी प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला. मेल, एक्स्प्रेस गाड्यांमधील जनरल श्रेणीच्या डब्यातील गर्दी वाढली आहे. रेल्वे प्रशासनाने पॅसेंजर गाड्या सुरू करण्याची मागणी प्रवासी करीत आहे. यामुळे रेल्वे मार्गावरील लहान गावांतील प्रवाशांना लाभ होणार आहे. (Good response from passengers to general category tickets of railways Jalgaon news)

कोरोनाकाळात सर्वच रेल्वे बंद होत्या. पहिल्या लाटेनंतर रेल्वेने ठराविक रेल्वे सुरू केल्या. दुसऱ्या लाटेनंतर काही ठराविक मेल, एक्स्प्रेस रेल्वे सुरू झाल्या. मात्र प्रवाशांना तिकिटाचे आरक्षण करूनच प्रवास करता येत होता. जनरल तिकीट दिले जात नव्हते. सर्वसामान्य श्रेणीने प्रवास करणाऱ्यांना यामुळे आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत होता. यामुळे पॅसेंजर गाड्या सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली होती. आता काही ठराविक पॅसेंजर गाड्या सुरू झाल्या आहेत. यामुळे जनरल तिकीट देण्यास रेल्वेने आजपासून सुरवात केली आहे. जळगावसह भुसावळ, चाळीसगाव, पाचोरा, मनमाड, अकोला, शेगाव आदी स्थानकांवर जनरल श्रेणीचे तिकीट घेण्यास प्रवाशांची गर्दी झाली होती. पहिल्याच दिवसांपासून सर्वच गाड्यांतील जनरल श्रेणीचा डबा फुल झाल्याचे चित्र पहावयास मिळाले.

‘यूटीएस’ॲपचा लाभ
भुसावळ विभागात काही निवडक स्थानकांवर एटीव्हीएम आणि यूटीएस ॲपद्वारे प्रवासी आपले तिकीट बुक करू शकतात. या सुविधेचा अनेकांनी लाभ घेतला. यामुळे त्यांचा तिकिटासाठी रांगेत उभे राहण्याचा वेळ वाचला आहे.

Passengers purchasing general tickets
जळगाव : ‘गोल्डनमॅन’ बनण्याची वाढली ‘क्रेझ’

प्रवासी काय म्हणतात...
प्रवाशांना दिलासा
दीपक मोरे (प्रवासी) ः रेल्वेने जनरल श्रेणीचे तिकीट देणे सूरू करून सर्वसामान्य प्रवाशांना दिलासा दिला आहे. गावाला जाण्यासाठी आरक्षित श्रेणीचे तिकीट काढून आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत होता. आता जनरल श्रेणीचे तिकीट मिळाल्याने बचत होईल. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेनंतर रेल्वेने जनरल तिकीट देणे सुरू करायला हवे होते.


पॅसेंजर गाड्या सुरू करा
योगेश पाटील (प्रवासी) ः रेल्वेचे जनरल तिकीट मिळत नसल्याने अनेक प्रवाशांनी बस, खासगी वाहनाने प्रवास सुरू केला होता. आता रेल्वेने भुसावळपासून मनमाडपर्यंत एक पॅसेंजर गाडी सकाळी व एक सायंकाळी सुरू करावी, जेणेकरून नोकरी, व्यवसायानिमित्त अप-डाउन करणाऱ्यांची सोय होईल.

Passengers purchasing general tickets
Jalgaon : जिल्ह्यातील 24 ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.