Yashwantrao Chavan Colony Scheme: जिल्ह्यात विमुक्त जाती, भटक्या जमाती (विजाभज) प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी असलेल्या यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत घरकुल योजनेत २०२३-२४ या वर्षासाठी एक हजार ४९ लाभार्थ्यांच्या घरकुल प्रस्तावास शासनाने मान्यता दिली आहे.
यामुळे ‘विजाभज’ प्रवर्गातील या लाभार्थ्यांचे घरकुलाचे स्वप्न साकार होणार आहे. (Government approved Gharkul proposal of one thousand 49 beneficiaries in Yashwantrao Chavan Mukta Vasahat Gharkul Yojana jalgaon news)
शासनाच्या इतर मागास बहुजन विभागातर्फे ‘विजाभज’ प्रवर्गातील वैयक्तिक लाभार्थ्यांसाठी रमाई आवास योजनेच्या धर्तीवर यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत घरकुल योजना राबविण्यात येते. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत/घरकुल योजना जिल्हास्तरीय स्थापन करण्यात आलेली असते.
या समितीचे सदस्य सचिव म्हणून समाजकल्याण सहाय्यक आयुक्त हे काम पाहतात. या समितीने जिल्ह्यात घरकुल योजनेसाठी प्राप्त प्रस्तावांना तत्काळ प्रशासकीय मान्यता देत कार्योत्तर मान्यतेसाठी मुंबई येथे इतर मागास बहुजन विभागाकडे प्रस्ताव पाठविला. या प्रस्तावास शासनाने कार्योत्तर मान्यता दिली आहे.
घरकुल बांधकामासाठी प्रतिलाभार्थी एक लाख २०, याप्रमाणे एक हजार ४९ लाभार्थ्यांसाठी १२ कोटी ५८ लाख ८० रुपयांच्या निधीस ही मान्यता दिली आहे. यापैकी तीन कोटी २८ लाख रुपयांचा निधी तत्काळ उपलब्ध करून दिला आहे.
या योजनेच्या लाभासाठी जळगाव जिल्हास्तरीय समितीने पात्र ठरविलेल्या व छाननीअंती अंतिम केलेल्या लाभार्थ्यांपैकी फक्त शासननिर्णय १८ डिसेंबर २०२३ ला जोडण्यात आलेल्या ‘परिशिष्ट-अ’ मध्ये नमूद पात्र लाभार्थ्यांनाच सदरहू योजनेचा लाभ दिला जाणार आहे. सर्व लाभार्थी विजाभज प्रवर्गातील वैयक्तिक जात प्रमाणपत्रधारक असणे बंधनकारक असून, अशाच व्यक्तीस सदरहू योजनेचा लाभ दिला जाईल. ज्या व्यक्तीचे जात प्रमाणपत्र आहे त्याच व्यक्तीस लाभ देण्यात येईल.
लाभासाठी हे आहे आवश्यक
या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना २०२२-२३ या वर्षाचा उत्पन्नाचा दाखला, अधिवास प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील. नावात तफावत असल्यास ती दूर करण्यासाठी संबंधित व्यक्तीच्या नावाचा, पालकाच्या नावाचा व आडनावाचा पुरावा ग्राह्य धरला जाईल. पात्र लाभार्थ्यांची नावे दुबार झाल्यास ती वगळली जातील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.