Jalgaon News: विकासासाठी शासनाकडून 200 कोटी मंजूर; फडणवीस, महाजन यांच्या उपस्थितीत निर्णय

Devendra Fadnavis
Devendra Fadnavis esakal
Updated on

जळगाव : शहरातील विकासकामांसाठी २०० कोटींचा विकास निधी देऊन येत्या सहा महिन्यात शहरातील प्रमुख व अंतर्गत रस्त्यांची कामे पूर्ण करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबईत सोमवारी (ता. ९) झालेल्या बैठकीत घेण्यात आला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनात ही बैठक होऊन त्यांनी निधी दिला जाईल, असे सांगितिले. (Government approves 200 crores for development Decision in presence of Fadnavis Mahajan Jalgaon News)

हेही वाचा : योग्य वेळेतच करा इच्छापत्र आणि व्हा चिंतामुक्त

Devendra Fadnavis
YIN Election 2023 : लोकशाहीच्‍या मेळ्याचा तरुणाईकडून जल्‍लोष; ‘यिन’च्‍या निवडणुकीला प्रतिसाद

शहरातील विविध कामे निधीअभावी रेंगाळली आहेत. सत्ताधारी गटाकडून कामे होत नसल्याबाबत प्रचंड तक्रारी होत्या. शहरवासीयांकडून या प्रश्नी नाराजी व्यक्त केली जात असल्याचा विषय लक्षात घेऊन राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील,

आमदार सुरेश भोळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बैठक घेऊन शहर विकासासाठी निधीची मागणी करण्यासंदर्भात बैठक घेण्याचे ठरविले होते. त्यानुसार ही बैठक सोमवारी झाली. आमदार सुरेश भोळे, आमदार मंगेश चव्हाण व अन्य अधिकारी उपस्थित होते. एका बैठकीमुळे पालकमंत्री गुलाबराव पाटील बैठकीस उपस्थित नव्हते.

शहरातील प्रमुख रस्ते व अंतर्गत रस्त्यांची कामे येत्या सहा महिन्यांत पूर्ण करून जनतेची रस्त्यांबाबतची तक्रार दूर करण्याचा निर्णय या बैठकीत झाल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. यासाठी २०० कोटी उपलब्ध करून दिले जातील, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

Devendra Fadnavis
Nashik Crime News : सिडकोत गावगुंडांचा 2 तरुणांवर हल्ला; पोलिसांचा वचकच शिल्लक नाही!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()