Jalgaon News : जुनी पेन्शन योजनेसाठी शासकीय कर्मचारी संपावर जाणार..?

Strike
Strikeesakal
Updated on

जळगाव : जुनी पेन्शन योजना लागू करावी, यांसह विविध मागण्यांसाठी शासकीय कर्मचारी पुढील महिन्यात संपावर जाणार आहेत. त्यासाठी जळगाव जिल्हा राज्य सरकारी कर्मचारी संयुक्त संघटनेची सभा ३ फेब्रुवारीस सायंकाळी सहाला संघटनेच्या कार्यालयात होणार आहे. (Government employees will go strike next month for various demands including implementation of old pension scheme Jalgaon news)

राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीने यापूर्वीच सर्व कर्मचारी, शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी व आउटसोर्सिंगद्वारे कंत्राटी कर्मचारी, फिक्स पे, सेवेतील कर्मचाऱ्यांना सेवेत नियमित करणे.

इतर प्रलंबित मागण्यांच्या पूर्तीसाठी अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ, राज्य सरकारी वर्ग ‘ड’ कर्मचारी महासंघ व शिक्षक संघटना समन्वय समितीची बैठकीचे आयोजन करून त्यांच्या सहभागाने राज्यव्यापी बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा : ....इथं बनतो आपला लाडका तिरंगा

Strike
Jalgaon News : शेतातील मोबाईल टॉवर हटविण्यासाठी उपोषण

या पार्श्वभूमीवर जिल्हा शाखेने बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय ठराव करून १२ फेब्रुवारीच्या नाशिकच्या बैठकीत सादर करावयाचा आहे. त्यासाठी वरील बैठक होणार असल्याचे संघटनेने कळविले आहे.

Strike
Jalgaon News: वाळूची चोरटी वाहतूक सुरूच; पोलिसांनी पकडले ट्रॅक्टर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.