Jalgaon News : ‘नाफेड’अंतर्गत हरभरा खरेदीला सुरवात; 17 केंद्रांवर नोंदणीचे पणनचे आदेश

gram crop
gram cropesakal
Updated on

अमळनेर (जि. जळगाव) : नाफेड अंतर्गत शासकीय हरभरा खरेदी प्रक्रियेला सुरवात झाली आहे. जिल्ह्यातील १७ खरेदी केंद्रावर (Centers) नोंदणीला सुरवात करण्याचे आदेश जिल्हा पणन अधिकारी जी. एन. मगरे यांनी दिले आहेत. (Government gram procurement process under NAFED has started jalgaon news)

जिल्ह्यात शेतकी संघ अमळनेर, पारोळा, चोपडा, एरंडोल केंद्रांतर्गत धरणगाव व कासोदा खरेदी केंद्र, पाळधी फ्रूटसेल सोसायटी, जळगाव शेतकी संघ अंतर्गत म्हसावद खरेदी केंद्र, जळगाव औद्योगिक कृषी सेवा केंद्र, भुसावळ,

कोरपावली सोसायटीला यावल खरेदी केंद्र, रावेर, मुक्ताईनगर, बोदवड को ऑप परचेस सेल, जामनेर, पाचोरा, भडगाव, चाळीसगाव शेतकी संघ या सतरा केंद्रांवर खरेदी करण्यास परवानगी दिली आहे.

हेही वाचा : कॅशबॅक किंवा खरेदीवर सूट मिळणारंच कार्ड निवडा...

gram crop
Jalgaon Water Crisis : तापमान वाढल्याने भुसावळ, बोदवड, यावल, धरणगाव डेंजर झोनमध्ये!

हरभरासाठी ५ हजार ३३५ रुपये हमीभाव जाहीर करण्यात आला आहे. प्रत्यक्ष खरेदी सुरू करण्याची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. येत्या पंधरा दिवसात खरेदी सुरू होईल.

"शेतकऱ्यांनी पीकपेरा लावलेला सातबारा उतारा, आधार कार्ड, बँकेचे पासबुक आदी कागदपत्रे स्कॅन करावी. ऑनलाइन पद्धतीने नोंदणी होणार असून, रोजच्या रोज क्रमाने नावे नोंदली जातील." -संजय पाटील ,व्यवस्थापक ,शेतकी संघ ,अमळनेर

gram crop
Skilled India Mission : मुलांच्या भाषाज्ञानात वृद्धी, संख्यात्मक कौशल्यात वाढ!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.