Jalgaon: पदवीधर नोंदणीबाबत शासनाची उदासीनता; ऐन सणासुदीत मतदारयादीचा कार्यक्रम

Graduate Constituency
Graduate Constituencyesakal
Updated on

जळगाव : एकीकडे मतदानाचा टक्का वाढावा, म्हणून प्रत्येकवेळी निवडणूक आयोगाचे प्रयत्न होत असताना, विधानपरिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी सुरू असलेल्या मतदार नोंदणीत आयोगाने घालून दिलेल्या जाचक अटींमुळे पदवीधर नोंदणीपासून पूर्णपणे दूर, उदासीन आहे. शासनही नोंदणीबाबत उदासीन असून, मतदार नोंदणीचा कार्यक्रम सणासुदीच्या व सुटीच्या दिवसांत लागल्याने इच्छुक पदवीधरांनी या नोंदणीकडेच पाठ फिरवल्याचे चित्र आहे.

विधानपरिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी फेब्रुवारीमध्ये निवडणूक होऊ घातली आहे. त्यासाठी मतदार नोंदणीची प्रक्रिया सध्या सुरू असून, त्याची मुदत ७ नोव्हेंबरपर्यंत आहे.(Government indifference to graduate enrollment Voter list program during festive seasons Jalgaon News)

Graduate Constituency
District Milk Union Election: निवडणुकीसाठी 79 अर्जांची विक्री

जाचक अटींचा नोंदणीत खोडा

निवडणूक आयोग एकीकडे प्रत्येक निवडणुकीवेळी मतदानाचा टक्का वाढावा, म्हणून प्रयत्न केला जातो. त्यासाठी मतदार नोंदणीवरही भर दिला जातो. आता पदवीधरच्या निवडणुकीसाठी मात्र आयोगाने घालून दिलेल्या अटी इतक्या जाचक आहेत, की पदवीधरांनी या नोंदणीकडे पाठ फिरविल्याचे चित्र आहे.

अशा आहेत अटी

शासनाने प्रत्येक शासकीय, शैक्षणिक कामासाठी स्वसाक्षांकित प्रतीचा (सेल्फ अटेस्टेड) नियम केला असताना, मतदार नोंदणीसाठी इच्छुक पदवीधराला आधारकार्ड, मार्कशीट अथवा पदवी प्रमाणपत्र आदी कागदपत्रांसाठी राजपत्रित अधिकाऱ्याकडून प्रत साक्षांकित करणे अनिवार्य केले आहे. नोंदणीसाठी मतदाराचा पासपोर्ट फोटो बंधनकारक केला, हे ठीक आहे, पण फोटोचे बॅकग्राउंड पांढरेच हवे, असा नियम केला आहे. शिवाय अनेक पदवीधर नोकरीनिमित्त मूळ गाव, शहर सोडून अन्यत्र असतात, त्यांनाही नोकरीच्या ठिकाण नोंदणीसाठी अडचण येत आहे. प्रत्येकवेळी पदवीधर मतदारसंघासाठी नोंदणी करणे अनिवार्य असल्यानेही बहुतांश पदवीधर आधीच नोंदणी केली आहे, पुन्हा कशी आणि का करायची, असा प्रश्‍न उपस्थित करीत आहेत. अशा जाचक अटींमुळे पदवीधरांमध्ये नोंदणीसाठीच निरुत्साह दिसून येत आहे.

Graduate Constituency
MLA Suresh Bhole : महापौरांनी विकासाकडे लक्ष द्यावे

शासनाची उदासीनता

शासनही या निवडणुकीच्या मतदार नोंदणीसाठी कमालीचे उदासीन आहे. एकतर दिवाळीची सुटी असताना, शासनाने, आयोगाने हा मतदार नोंदणीचा कार्यक्रम लावला. त्याची कुठेही प्रचार, प्रसिद्धी केली नाही. नोंदणीचे अर्ज कुठे मिळतील, ती कशी करावी, कोणती कागदपत्रे जोडावी, ऑनलाइन नोंदणी कशी करावी, यासाठी विशेष जनजागृतीपर कार्यक्रम झाले नाहीत. शाळा, महाविद्यालयांना सुटी असताना, हा कार्यक्रम लागल्याने या नोंदणीच्या मुख्य ठिकाणीच नोंदणी होऊ शकलेली नाही. मतदार नोंदणीची मुदत अवघी ७ नोव्हेंबरपर्यंत असताना, आतापर्यंत जळगाव जिल्ह्यातून केवळ सात हजार ८८७ एवढीच नोंदणी होऊ शकली आहे.

उमेदवारांचे स्टॉल्स

एकीकडे शासन, आयोगाच्या स्तरावर मतदार नोंदणीबाबत कमालीची उदासीनता असताना, काही स्वयंघोषित उमेदवारांनी जळगाव शहरात काही ठिकाणी मतदार नोंदणीचे स्टॉल्स लावल्याचे दिसून आले. पदवीधर असे रस्त्यावर उभे राहून कशी मतदार नोंदणी करतील, हाही प्रश्‍न आहे.

डॉ. सुधीर तांबेंसमोर कोण?

एकीकडे कॉंग्रेसचे उमेदवार म्हणून विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे निश्‍चित आहेत. मात्र, त्यांच्यासमोर भाजप किंवा अन्य पक्षांकडून कोणताही उमेदवार अद्याप समोर आलेला नाही. डॉ. तांबे यांनी प्रचाराला सुरवातही केली आहे. विरोधी गटात मात्र अद्याप सामसूम आहे.

Graduate Constituency
Sushma Andhare Statement : सोमय्यांनी वैद्यकीय,जमीन गैरव्यवहारही पाहावा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()