Jalgaon GMC : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 5 विभागांसाठी 21 जागा मंजूर

Jalgaon Government Medical College and Hospital
Jalgaon Government Medical College and Hospitalesakal
Updated on

जळगाव : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगातर्फे ‘एमडी’ आणि ‘एमएस’ अभ्यासक्रम शिकविण्यासाठी मान्यता मिळाली आहे. (Government Medical College 21 seats sanctioned for 5 departments jalgaon news)

मागील महिन्यात आयोगातर्फे महाविद्यालयात पाहणी करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी पाच विभागांसाठी २१ जागा मंजूर केल्या आहेत. यामुळे जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या नावलौकिकात आणखी भर पडली असून, विद्यार्थ्यांना त्याचा मोठा फायदा होणार आहे.

राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने जळगावमध्ये मार्च महिन्यात सुविधा, मनुष्यबळ आदी बाबींची तपासणी केली होती. विविध विभागप्रमुखांनी त्यांच्या विभागाबद्दल माहिती देऊन सादरीकरण केले होते.

राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगातर्फे आता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला एमडी व एमएस अभ्यासक्रम शिकविण्यासाठी मान्यता देण्याबाबत पत्राद्वारे कळविले आहे. यात स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभाग, औषधवैद्यकशास्त्र विभागात प्रत्येकी ७ जागा मंजूर केल्या आहेत, तर बधिरीकरणशास्त्र विभागाला ४, बालरोग चिकित्सा शास्त्र विभाग २, अस्थिव्यंगोपचार विभागाला १ जागा मंजूर झाल्या आहेत. अशा ५ विभागांसाठी २१ जागा एमडी अभ्यासक्रम शिकविण्यासाठी मंजूर झाल्या आहेत.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

Jalgaon Government Medical College and Hospital
Onion Subsidy : शेतकऱ्यांनी कांदा अनुदानासाठी 'या' तारखेपर्यंत अर्ज करावेत; चंद्रकांत पवार यांचे आवाहन

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य मंत्री गिरीश महाजन यांनी गुरुवारी (ता. ३०) महाविद्यालयात झालेल्या कार्यक्रमातही ‘एमडी’ व ‘एमएस’ अभ्यासक्रमासाठी जागा मिळाल्याबद्दल अधिष्ठाता आणि विभागांचे कौतुक केले होते. आगामी काळात पुढील शैक्षणिक वर्षी या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार असल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी दिली.

"शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला पदव्युत्तर अभ्यासक्रम शिकविण्यासाठी मान्यता मिळाली आहे. विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमांचा मोठा फायदा होणार आहे. भविष्यात आणखी इतर विभागांतही पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू होण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. विभागांना यामुळे आणखी बळ व प्रोत्साहन मिळणार असून, अधिकाधिक ऊर्जेने विभाग कार्यरत राहतील." -डॉ. गिरीश ठाकूर, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव

Jalgaon Government Medical College and Hospital
Jalgaon News : ‘खरिपा’तील 80 टक्के कापूस पडून; 10 हजारांच्या दराची प्रतिक्षा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.