Jalgaon News : शासनातर्फे मंगळवारी (ता. २७) येथे ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम होणार आहे. त्याच्या तयारीसाठी शनिवारी (ता. २४) सुटी असतानाही सर्व शासकीय कार्यालये सुरू होती.
तर, रविवारी (ता. २५)देखील कार्यालये सुरू राहणार आहेत. दरम्यान, महापालिकेत आज तयारीसाठी आयुक्तांनी सुक्ष्म बैठक घेतली.(Government offices open even on holidays Preparation of government door Commissioner took a close look at Municipal Corporation Jalgaon News)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत जळगावात मंगळवारी हा कार्यक्रम होत आहे. शासकीय योजनेतील लाभार्थ्यांना लाभाचे पत्र वाटप करण्यात येणार आहेत.
याच्या तयारीसाठी शनिवार व रविवारी सुटीच्या दिवशीही शासकीय कार्यालये सुरू ठेवण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालये आज सुरू होती. जळगाव महापालिकेतही कामकाज सुरू होते. सर्वच विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
महापालिका आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी दुपारी सर्व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सुक्ष्म नियोजनाची बैठक घेतली. या वेळी त्यांनी कार्यक्रमस्थळी महापालिकेच्या विविध विभागातर्फे करण्यात येणाऱ्या कामांची माहिती दिली.
बाहेरगावाहून येणाऱ्या नागरिकांसाठी सात मैदानांवर उतरण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्या ठिकाणी पाणी वाटप, स्वच्छता सुविधा यासाठी महापालिकेचे कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहेत. तसेच, सर्व मैदानांवर प्रसाधनगृहांची व्यवस्था करण्यात येणार असून, जिल्ह्यातील नगरपालिकांकडून मोबाईल टॉयलेट व्हॅन महापालिकेने मागविल्या आहेत.
महापालिकेचे कर्मचारी कार्यक्रमाच्या ठिकाणीही उपस्थित ठेवण्यात येणार आहेत. त्याचे कामही प्रत्येकाला देण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातही आज बैठकांचा धडका होता. तसेच, जिल्हा परिषद कार्यालयातही कामकाज सुरू होते. जिल्हाधिकारी अमन मित्तल व जिल्हा पोलीस अधिक्षक एम. राजकुमार यांनीही कार्यक्रम आयोजित करण्यात आलेल्या पोलीस कवायत मैदानाची पाहणी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.