जळगाव : माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी राज्यातील गायरान जमिनीवरील अतिक्रमणे काढण्यात येऊ नये तसेच मुक्ताईनगर तालुक्यात अवैधरीत्या सुरू असलेले गौण खनिज उत्खनन आणि चोरटी वाळू वाहतुकीबाबत प्रश्न उपस्थित केला. त्यावर महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी उत्तर दिले.
विखे पाटील यांनी उत्तर देताना सांगितले की, गायरान जमिनीवरील अनधिकृत बांधकामे ही वर्षअखेरपर्यंत निष्कासित करण्याबाबत ‘रोड मॅप’ तयार करण्याबाबत उच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत. त्यानुसार प्रतिज्ञापत्राद्वारे संबंधित ‘रोड मॅप’ उच्च न्यायालयात दाखल करण्यात आला आहे. (Government role in removing encroachments on Gairan Jalgaon News)
हेही वाचा : असं एक गाव, जिथं जमिनीला कान लावला तरी संगीत ऐकू येतं...
शासनाच्या यापूर्वीच्या इतर कोणत्याही धोरणानुसार पात्र होणारी संरक्षित होणारी अतिक्रमणे वगळून उर्वरित अतिक्रमण निष्कासित करावी, अशी शासनाची भूमिका आहे. तूर्तास हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून उच्च न्यायालयाने ६ डिसेंबर २०२२ रोजी दिलेल्या आदेशान्वये निष्कासनाच्या कार्यवाहीस स्थगिती दिली आहे.
अवैध गौण खनिज वाहतुकीचा मुद्दा
खडसे यांनी मुक्ताई नगर तालुक्यात अवैधरीत्या गौण खनिज उत्खनन व वाळू उपसा होत होत असल्याबद्दल तसेच सातोड शिवारात उत्खनन करताना एक जेसीबी आणि एक डंपर मुक्ताईनगर तहसीलदार यांनी जप्त केले होते त्यावर काय कारवाई झाली, असा प्रश्न उपस्थित केला.
त्यावर विखे पाटील यांनी मुक्ताईनगर तालुका क्षेत्रीय अधिकाऱ्यांना गौण खनिजाचे व वाळूचे अवैध उत्खनन व वाहतूक होणार नाही याबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याबाबत सूचित करण्यात आले आहे. तसेच या वाहतुकीला आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय मार्फत दक्षता पथक तसेच महसुल परिवहन व पोलिस यांच्या संयुक्त पथकामार्फत वेळोवेळी कारवाया करण्यात येतात, असे सांगताना मुक्ताईनगर तालुक्यात आतापर्यंत केलेल्या दंडात्मक कारवाईची आकडेवारी सादर केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.