चोपडा (जि. जळगाव) : सरकारला जी आकडेवारी सांगितली जाते, ती पूर्णतः: खोटी आहे. दरवर्षीच्या बजेटमध्ये पेन्शनबाबत तरतूद होते. फक्त त्या पैशांचे नियोजन केले तर जुनी पेन्शन योजना राबविली जाऊ शकते. (Graduate Constituency Election satyajeet tambe statement about truth Jalgaon news)
अडचण फक्त राजकीय इच्छाशक्तीची आहे. शिक्षण आरोग्यसेवा देणं, ही सरकारची जबाबदारी आहे. सरकार व्यवस्था देत नाही, मात्र अपेक्षा शंभर टक्के करते. मी राजकारण जवळून पाहिले आहे.
फक्त आणि फक्त आमच्या परिवाराला त्रास देण्याच्या हेतूने झालेले राजकारण आहे. हे अर्धसत्य तुमच्यासमोर आलेले आहे. पूर्ण सत्य तुमच्यासमोर येईल तेव्हा तुम्ही सुद्धा चकित झाल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन नाशिक पदवीधर मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांनी केले.
चोपडा येथील कला, शास्त्र, वाणिज्य महाविद्यालयात आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. प्राचार्य डॉ. डी. ए .सूर्यवंशी अध्यक्षस्थानी तर व्यासपीठावर आर. एच. बाविस्कर, काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रदीप पाटील, धनाजी नाना आदिवासी मंडळ सचिव ज्ञानेश्वर भादले, ग. स. संचालक मंगेश भोईटे, चेतन बाविस्कर डॉ. सुशील सोनवणे, अजित बाविस्कर, विजय देशमुख आदी उपस्थित होते.
हेही वाचा : प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?
सत्यजित तांबे म्हणाले, की माजी शिक्षणमंत्री (स्व.) शरदचंद्रिका पाटील, माजी आमदार डॉ. सुरेश पाटील यांच्यासारख्या शिक्षणप्रेमींनी उदात्त हेतूने या संस्था उभ्या केल्यात. देशातले एकही विद्यापीठ पहिल्या १०० मध्ये का नाही? याचा विचार केला पाहिजे. मी आंदोलनातून तयार झालेला कार्यकर्ता आहे. जिल्हा परिषद सदस्य असताना अनेक अडचणी समजावून सोडविल्या.
‘जुनी पेन्शन नो टेन्शन’ हा प्रश्न तडीस नेऊन संपविणार आहे. या वेळी उच्च माध्यमिक शिक्षक, शिक्षकेत्तर संघटना, आरोग्य संघटना जुनी पेन्शन हक्क समिती (वरिष्ठ महाविद्यालय) या संघटनांनी पाठिंबा दर्शविला.
प्रास्ताविक क्रीडा संघटना तालुकाध्यक्ष अशोक साळुंखे यांनी केले. या वेळी मंगेश भोईटे, आर. एच. बाविस्कर, प्रदीप पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. शैलेश वाघ यांनी कार्यक्रमाचे संचलन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.