जळगाव : जिल्ह्यातील १२२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी रविवारी (ता. १८) मतदान झाले. दोन लाख १५ हजार ६२९ मतदरांपैकी १ लाख ६९ हजार ३०७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. एकूण ८०.२४ टक्के मतदान झाले. (Gram Panchayat Election 81 percent voting for 122 gram panchayats in district jalgaon news)
१८ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून, १२२ ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले. सकाळी साडेसातला मतदान सुरू झाले. मतदान केंद्रावर मतदान यंत्रासह कर्मचारी, पोलिस बंदोबस्त सकाळपासून तैनात होता. पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी जळगाव तालुक्यातील काही मतदान केंद्रावर भेट देऊन पाहणी केली.
जिल्ह्यात एकूण ४२१ मतदान केंद्रे होती. सकाळपासून ग्रामीण भागात मतदारांचा मतदानासाठी उत्साह पाहावयास मिळाला. सायंकाळी मतदान संपल्यानंतर रात्री उशिरापर्यंत मतदान यंत्रे सीलबंद करून मतदान कर्मचाऱ्यांनी पोलिस बंदोबस्तात स्टॉंग रूममध्ये ठेवली आहेत. मंगळवारी (ता. २०) सकाळी दहापासून मतमोजणीस सुरवात होणार आहे.
हेही वाचा : ज्ञानेश्वरीत आहेत HR निगडित व्यवस्थापन सूत्रे...
एका तासात निकाल
मंगळवारी सकाळी दहाला मतमोजणी सुरू झाल्यानंतर एका तासात सर्व निकाल हाती येतील, अशी माहिती तहसीलदार नामदेव पाटील यांनी दिली. जळगाव तालुक्यातील ग्रामपंचयतीसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी नूतन मराठा महाविद्यालयात होणार आहे.
तालुकानिहाय झालेले मतदान असे
तालुका--ग्रामपंचायती--टक्केवारी
जळगाव--१०--८७.७०
जामनेर--११--८६.८६
धरणगाव--७--८३.८४
एरंडोल--५--८४.३५
पारोळा--५-८३.०६
भुसावळ--६-७६.५५
मुर्क्ताईनगर--२-७६.८२
बोदवड--५--८०.५५
यावल--८--७९.६७
रावेर--१८--७७.५८
अमळनेर--२०-७९.७०
चोपडा--५--७३.३६
भडगाव--६--८०.८९
चाळीसगाव--१४--७८.०४
एकूण--१२२--८०.२४
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.