Amalner Kavadyatra : अमळनेरला शिवभक्तांनी काढली कावडयात्रा; ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत

Shiva devotees participating in grand Kavad Yatra on the bridge over Tapi river.
Shiva devotees participating in grand Kavad Yatra on the bridge over Tapi river. esakal
Updated on

Amalner Kavadyatra : येथील शिवभक्तांनी सालाबादप्रमाणे यंदाच्या वर्षीही तापी नदी पात्र ते वर्णेश्वर महादेव मंदिरपर्यंत भव्य कावडयात्रा काढली.

माजी नगराध्यक्ष वर्णेश्वर संस्थानचे अध्यक्ष सुभाष चौधरी यांनी मोजक्या शिवभक्तांसोबत २०१३ पासून सुरू केलेल्या कावड यात्रेस यंदा खऱ्या अर्थाने भव्य यात्रेचे स्वरूप आले होते.

२५०० पेक्षा अधिक शिवभक्त यंदा यात्रेत उत्स्फर्तपणे सहभागी झाले होते. (Grand Kawad Yatra from Tapi river to Varneshwar Mahadev Temple amalner jalgaon news)

जळोद येथे तापी नदीवर जलपूजन करून सर्व शिवभक्तांनी आपापल्या कलशांमध्ये तापीमाईचे जल भरून कावड खांद्यावर घेत बँडच्या तालावर सर्व कावड यात्री उत्साहात वाजत गाजत व नाचत शिवघोषात मार्गस्थ झाले. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संदीप पाटील व जळोदचे सरपंच मुन्ना साळुंखे यांनी सर्व शिवभक्तांची भेट घेतली व शुभेच्छा दिल्या.

जळोद येथे शिवभक्त शिवदास सुभेदार यांनी कावड यात्रेचे प्रणेते सुभाष चौधरींना घोड्यावर बसून मिरवणूक काढली तर सुभेदारांच्या आईच्या स्मरणार्थ सुभाष चौधरी यांच्याहस्ते वृक्षारोपण करून घेतले. यावेळी मंत्री अनिल पाटील यांच्यासह माजी आमदार स्मिता वाघ यांनीही वृक्षारोपण करून शिवभक्तांना शुभेच्छा दिल्यात.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Shiva devotees participating in grand Kavad Yatra on the bridge over Tapi river.
Jalgaon District Collector : ‘दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी’ अभियान राबवा : जिल्हाधिकारी प्रसाद

कावड यात्रेनिमित्त अंमळगाव येथे शिवभक्त व उद्योजक श्रीराम चौधरी यांनी महाप्रसादाचे आयोजन केले होते. त्यांच्यासोबत प्रवीण चौधरी, भूषण सुरेश, चंद्रशेखर एकनाथ, इंजि .गिरीश पाटील, डॉ. संजय पवार, भाऊराव पवार उपस्थित होते. खा. शि. मंडळाचे चेअरमन डॉ. अनिल शिंदे, हरी भिका वाणी, विक्रांत पाटील, सुनीता पाटील टेकडी ग्रुपचे आशिष चौधरी, विनोद थोरात, प्रवीण पाटील, गोरख पारधी, निंबा दला, पाडळसे समितीचे महेश पाटील, रवी पाटील, एन. के. पाटील, अजयसिंग पाटील, श्याम पूरकर यांनीही यात्रेस भेट देऊन शिवभक्तांना शुभेच्छा दिल्या.

कावड यात्रेत सानेनगर, तांबापूर नंदगाव, सुंदरपट्टी रडावन-राजोरे, गांधली अंमळगाव व अमळनेर शहरातील शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. कावड यात्रा यशस्वी करण्यासाठी रामराव पवार, राजू देसले, रडावणचे रवींद्र पाटील, नंदगावचे दामोदर पाटील, सुखदेव पाटील,साने नगरचे नरेंद्र पाटील जगदीश पाटील, नाना पाटील ,भास्कर पाटील,नारायण बद्गुजर यांनी परिश्रम घेतले. शिवसेना तालुकाप्रमुख प्रथमेश पवार,हेमंत भांडारकर, रणजित शिंदे, संजय निंबा, अजयसिंग पाटील, मुन्ना सोनार आदींनी सहकार्य लाभले.

Shiva devotees participating in grand Kavad Yatra on the bridge over Tapi river.
Jalgaon News : जिवंत माणसाचे नाव शहीद स्मारकावर! पंचायत समितीचा भोंगळ कारभार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.