Jalgaon Rajya Balnatya Spardha : राज्य बालनाट्य स्पर्धेत गुरुवारी (ता.१८) बाल कलाकारांनी एकापेक्षा एक सरस नाटकांचे सादरीकरण करून रसिकांची वाहवा मिळविली.
स्पर्धेच्या चौथ्या दिवशी सर्वच बाल कलाकारांनी विविध घटकातील मुलांच्या समस्या, त्यांच्या अडचणी, त्यांच्यासमोरील आव्हाने नाटकाच्या माध्यमातून मांडले. (Great acting by child actors in rajya balnatya spardha jalgaon news )
आयडेंटीटी : अनाथ, फुटपाथवर राहणाऱ्या, हातमजुरी करणाऱ्या परंतु, शिकण्याची जिद्द असलेल्या मुला, मुलींची व्यथा या नाटकात दाखविण्यात आली आहे. भुसावळ येथील पुंडलिक गणपत बऱ्हाटे माध्यमिक विद्यालयाने या नाटकाचे सादरीकरण केले.
शोध अस्तित्वाचा : धावपळीच्या आणि मोबाईलच्या युगात हरवलेल्या कुटुंबाची कहाणी या नाटकात दाखविण्यात आली आहे. जळगाव येथील ब. गो. शानबाग विद्यालयाने हे नाटक सादर प्रेक्षागृहात सगळ्यांना अंर्तमुख करुन गेले.
आई मला छोटीशी बंदूक देना : दिव्यांग मुलाची व्यथा मांडणारे हे बालनाट्य असून दिव्यांग असल्याने इतर मुले त्या मुलाला त्यांच्यासोबत खेळू देत नाहीत. सैनिक बनण्याची त्याची इच्छा असल्याने तो आईकडे बंदूक मागतो आणि देशसेवेसाठी सैनिक होतो, असे यात दाखविण्यात आले आहे. ला. ना. सार्वजनिक विद्यालयाने नाटक सादर केले.
खेळ : भुसावळ येथील जय गणेश फाउंडेशनने सादर केलेले हे नाटक डोंबारी जमातीवर आधारित आहे, त्यांच्या जीवनात चाललेले संघर्षमय यात्रेचे दर्शन या बालनाट्यातून घडविण्यात आले आहे. सत्य जीवनावर आधारित हे नाटक आहे.
मारुतीची जत्रा : हे बालनाट्य तमाशा कलावंतांच्या मुलांचे भावविश्व व त्यांच्या अडचणीवर भाष्य करते. एकूणच या बालनाट्यात बालमनाचा ठाव घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
म्हावरा घावलाय गो : हे बालनाट्य आगरी कोळी भाषेचा आधार घेऊन रचण्यात आले आहे. कोळी नृत्याची आवड आणि जान असल्याने ही स्वतःची आवड पूर्ण करण्यासाठी शाळा सोडणाऱ्या विद्यार्थ्यावर आधारित हे नाटक आहे. जळगाव येथील नाट्यरंग बहुउद्देशीय संस्थेने या नाटकाचे सादरीकरण केले.
आजची नाटके, समारोप
शुक्रवारी (ता.१९) सकाळी १० वाजता बेला, ११.१५ वाजता विधी, दुपारी १२.३० वाजता आम्हीही आहोत निराळे, १.४५ वाजता आदींबाच्या बेटावर, ३ वाजता एलियन द ग्रेट आणि ४.१५ वाजता मरी गई आदी नाटकांच्या सादरीकरणाने स्पर्धेचा समारोप होईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.