जळगाव : सभासद कर्जावरील व्याजदर कपात, तसेच मृत सभासदांसाठी शंभर टक्के कर्जमाफीच्या निर्णयापाठोपाठ फेब्रुवारी २०२३ पासून यापुढे कोणत्याही कारणास्तव ग. स. चा सभासद मृत झाल्यास ग्रुप नैसर्गिक मृत्यू जीवनसुरक्षा विमा पॉलिसीद्वारे लाख, अपघाताने मृत्यू झाल्यास
‘ग्रुप जनता अपघात विमा’अंतर्गत मृत सभासदांच्या कुटुंबीयांना एकूण दहा लाख आर्थिक सहाय्य म्हणजे ‘जिंदगी के साथ भी और जिंदगी के बाद भी’ मदत करण्याचा निर्णय संस्थेचे अध्यक्ष उदय मधुकर पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यकारी मंडळाने घेऊन वचनांची पूर्तता केलेली आहे. (Group natural death life insurance cover for members Jalgaon News)
ग. स. सोसायटी ११४ व्या वर्षांत पदार्पण करीत आहे. यामुळे जगावेगळा निर्णय घेणारी राज्यातीलच नव्हे, तर देशातील पहिली संस्था असेल, ज्याची नोंद सहकार जगताच्या इतिहासाला घ्यावी लागेल, असा निर्णय अध्यक्ष पाटील यांच्या कार्यकारी मंडळाने घेतला आहे.
२०२०/२१ या आर्थिक वर्षात कोरोनामुळे ४९६ सभासदांचा मृत्यू झाल्याने निर्माण झालेल्या भयावह परिस्थितीचा विचार करून सभासद व संस्थेच्या आर्थिकहिताला प्राधान्य देऊन समाजाभिमुख कल्याणकारी योजना राबविण्याच्या उदात्त हेतूने संस्थेने ‘ग्रुप नैसर्गिक मृत्यू जीवनसुरक्षा विमा’ पॉलिसी काढली आहे.
हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.