Jalgaon News : अवयवदानासाठी सर्व घटकांनी पुढे यावे : पालकमंत्री पाटील

G44515 Guardian Minister Gulabrao Patil and others while giving oath to those present for organ donation awareness in 'GSC' on Friday.
G44515 Guardian Minister Gulabrao Patil and others while giving oath to those present for organ donation awareness in 'GSC' on Friday. esakal
Updated on

Jalgaon News : अवयवदान श्रेष्ठदान असून, नागरिकांसह स्वयंसेवी संस्थांनी प्रचार व प्रसारासाठी पुढे आले पाहिजे. अवयवदान मोहिमेसाठी शासकीय पातळीवर विविध विकासात्मक निर्णय घेतले जातील. (Guardian Minister gulabrao Patil statement about All parties should come forward for organ donation jalgaon news)

अवयवदानामुळे अनेक व्यक्तींचे जीव वाचू शकतात, असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शुक्रवारी (ता. ७) येथे केले. वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या अवयवदान जनजागृती व उपचार अभियानास जागतिक आरोग्य दिनानिमित्त शुक्रवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (जीएमसी) सुरवात झाली.

त्यावेळी ते बोलत होते. अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड, जनऔषध वैद्यकशास्त्र विभागप्रमुख डॉ. योगिता बावस्कर, नोडल ऑफिसर डॉ. सुनयना कुमठेकर उपस्थित होत्या.

पालकमंत्री पाटील म्हणाले, की आपल्या देशाने वैद्यकीय क्षेत्रात प्रगती केली आहे. आपल्या संस्कृतीत दानाला महत्त्व आहे. मृत्यू पश्चात अवयवदान करून साधारण आठ जणांचे आयुष्य वाचू शकते. नेत्रदान, त्वचा दान करून अनेकांचे आयुष्य आपण बदलू शकतो.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

G44515 Guardian Minister Gulabrao Patil and others while giving oath to those present for organ donation awareness in 'GSC' on Friday.
Shinde Vs Thackeray : नाव चिन्ह मिळाल्यानंतर शिवसेनेचे मिशन इनकमिंग होणार सुरू....

अधिष्ठाता डॉ. ठाकूर यांनी अभियान कसे राहील याची माहिती दिली. या वेळी अवयवदान केलेले नातेवाईक व जनजागृती करणाऱ्या डॉ. पल्लवी राणे, डॉ. रवींद्र पाटील, सीमा भगत, किशोर सूर्यवंशी यांचा पालकमंत्री पाटील यांनी सत्कार केला.

अवयवदान जनजागृतीबाबत महाविद्यालयात रांगोळी व पोस्टर स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धांचे उद्‌घाटन पालकमंत्री पाटील यांनी केले व त्यांनी रांगोळी, पोस्टर्सचे अवलोकन केले. त्याठिकाणी जनजागृतीपर उभारलेल्या सेल्फी पॉईंटवर त्यांनी सेल्फी घेतला.

स्पर्धेतील विजेत्यांना पालकमंत्री पाटील यांनी ट्रॉफी देऊन गौरविले. विद्यार्थ्यांनी जनजागृतीपर पथनाट्य सादर केले. त्या ग्रुपचाही सत्कार पालकमंत्र्यांनी केला. अवयवदान जनजागृतीची उपस्थितांना शपथ देण्यात आली.

G44515 Guardian Minister Gulabrao Patil and others while giving oath to those present for organ donation awareness in 'GSC' on Friday.
Pachora Market Committee Election : पाचोरा येथे तिरंगी लढतीचे संकेत; युती-आघाडीचे गणित जुळेना

रुग्णांची चौकशी पालकमंत्री पाटील यांनी रुग्णालयात जाऊन रुग्णांची आस्थेवाइकपणे चौकशी केली. रुग्णालयातील सेवा-सुविधांविषयी अधिष्ठाता व वैद्यकीय अधीक्षक यांच्याकडून माहिती घेतली.

स्पर्धेतील विजेते असे

पोस्टर स्पर्धा : प्रथम- प्रतिज्ञा मोरे व कृष्णाई साळुंखे, द्वितीय- हनीफा मोमीन, तृतीय- प्रियंका शेळके.

रांगोळी स्पर्धा : प्रथम- गीतांजली आवारे, समृद्धी कवडे, द्वितीय- निकिता बाऱ्हे, पूजा दैठणकर, तृतीय- अंशीका मौर्या, साक्षी मोहर.

G44515 Guardian Minister Gulabrao Patil and others while giving oath to those present for organ donation awareness in 'GSC' on Friday.
Market Committee Election : कृषी उत्पन्न बाजार समितीवर शिवसेनेचा झेंडा फडकवणारच : किशोर पाटील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.