Gulabrao Patil | 22 हजार गावांच्या पाणीटंचाईवर मात : पालकमंत्री गुलाबराव पाटील

Guardian Minister Gulabrao Patil while inaugurating the warehouse.
Guardian Minister Gulabrao Patil while inaugurating the warehouse.esakal
Updated on

भडगाव (जि. जळगाव) : अगोदरच्या सरकारमधे पाणीपुरवठा मंत्री असताना, कॉंग्रेस, राष्ट्रवादीला पाणी पाजले, तर आता भाजपला पाणी पाजत आहे, असा मिश्कील टोला लगावत राज्यात मी मंत्री असताना, तब्बल २२ हजार गावांना पाणीपुरवठा योजना मंजूर करून पाणीटंचाई दूर करण्याचा प्रयत्न केला, असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. (Guardian Minister Gulabrao Patil Statement about water scarcity in 22 thousand villages jalgaon news)

शेतकरी सहकारी संघाच्या कोळगाव (ता. भडगाव) येथील गुदामाच्या लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर आमदार किशोर पाटील, शेतकरी संघाचे अध्यक्ष तथा जिल्हा बॅंकेचे संचालक प्रतापराव पाटील, जिल्हा बँकेचे संचालक मेहताबसिंग नाईक, माजी संचालक नानासाहेब देशमुख, बाळासाहेबांची शिवसेनेचे तालुकाप्रमुख संजय पाटील, उपजिल्हा प्रमुख डाॅ. विशाल पाटील, वडध्याचे युवराज पाटील, शेतकी संघाचे उपाध्यक्ष सुभाष पाटील, संचालक भय्यासाहेब पाटील, नगराज पाटली, जयंत पाटील, श्रावण लिंडायत, रमेश पाटील, संजय पाटील, नागेश वाघ, विश्वास पाटील आदी उपस्थित होते.

पालकमंत्री पाटील म्हणाले, की विरोधक आम्हाला गद्दार म्हणतात. मात्र, माझ्यासह २२ आमदार उद्धव ठाकरे यांच्याकडे गेलो. त्यांना एकनाथ शिंदे यांना परत बोलविण्याचा आग्रह केला. मात्र, त्यांनी तुम्हालाही जायचे असेल तर जा, असे उत्तर दिले. त्यानंतर आम्ही उठाव केला. भडगाव शेतकरी संघाचे काम खरंच कौतुकास्पद आहे. त्यांनी कर्ज फेडून दोन लाख नफा कमविला. त्यामुळे शेतकऱ्यांना असे काम करणाऱ्यांमागे उभे राहिले पाहिजे.

प्रतापराव पाटील व संचालक मंडळाचे काम उत्कृष्ट आहे. त्यामुळे आगामी निवडणूक बिनविरोध करावी, असे आवाहन ही त्यांनी केले. आम्ही जनरल फिजिशयन आहोत. लोक अनेक प्रकारचे काम घेऊन येतात. आतापर्यंत अडीच लाख कोटी किलोमीटर मी फिरलो आहे. त्यामुळे मला मी केलेल्या कामांवर भरोसा आहे. विरोधकांना काहीही टीका करू द्या. मात्र, जनता माझ्यासोबत आहे, म्हणून मला बिलकुल चिंता नाही.

Guardian Minister Gulabrao Patil while inaugurating the warehouse.
Nashik : मुंबईच्या वकिलाची हरवलेली बॅग पोलिसांच्या तप्तरतेने परत

शेतकरी संघाचे काम आदर्श

एकीकडे सहकार क्षेत्र मोडकळीस निघाले आहे. मात्र भडगाव शेतकरी सहकारी संघ नफ्यात आहे. हे कार्य इतर संस्थासाठी आदर्श आहे असे आमदार किशोर पाटील यांनी सांगितले. ते म्हणाले, की मी गिरणा धरणावरून भडगाव व पाचोरा शहरासाठी पाणीपुरवठा योजना मंजूर केली होती. मात्र, ती योजना झाली असती, तर गिरणेला पिण्याचे पाण्यासाठी सुटणारे आवर्तन बंद झाले असते.

पर्यायाने शेतकरी उद्धवस्त झाला असता. त्यामुळे ही योजना रद्द केली. महाविकास आघाडीचे सरकार असताना, निधी मिळायला अडचण होती. मात्र, आता चारच महिन्यांत अडीच वर्षांत जेवढा निधी मिळाला नाही, तेवढा निधी मिळाला. तर युवासेनेचे विस्तारक शदर कोळी यांचा समाचार घेताना ते म्हणाले, की जो माणूस तडीपार आहे. त्यांनी महाप्रबोधन यात्रा काढावी यापेक्षा दुर्दैव काय असू शकते.

आमदार निधीतून मंजूर असलेले कॉंक्रिटीकरणाचे भूमिपूजन झाले. प्रस्ताविकात संचालक भय्यासाहेब पाटील यांनी आमदारांकडे गुदामाला संरक्षण भिंतीची मागणी केली. पालकमंत्र्याकडे जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून सभागृहाची मागणी केली. श्री. वाघ यांनी सूत्रसंचालन केले. जयंत पाटील यांनी आभार मानले.

चिमणआबा आणि सतीश अण्णाचे ‘एक दुजे के लिये’

आमदार चिमणराव पाटील आणि माजी मंत्री डॉ. सतीश पाटील एकमेकांवर खालच्या पातळीला जाऊन टीका करतात. मात्र, जिल्हा बँक, दूध संघाची निवडणूक लागली, की हिंदी चित्रपटात असलेल्या गाण्याप्रमाणे ‘हम बने तुम बने एक दुजे के लिये’सारखे वागतात, असे पालकमंत्र्यांनी मिश्कीलपणे सांगताच एकच हंशा पिकला. अर्थात सहकारात राजकारण न आणता जो चांगले काम करीत असेल, त्याला संधी दिली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

Guardian Minister Gulabrao Patil while inaugurating the warehouse.
Market Committee Election : यंदाही शेतकरी मतदानापासून वंचित

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()