Jalgaon News : कारसेवकांच्या योगदानातून मंदिराची उभारणी : पालकमंत्री गुलाबराव पाटील

कारसेवकांचा सन्मान हा निश्चित कौतुकास्पद असून, कारसेवकाना नतमस्तक होतो, असे प्रतिपादन पालकमंत्री तथा शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी केले.
Guardian Minister Gulabrao Patil with Karsevak in Dharangaon area.
Guardian Minister Gulabrao Patil with Karsevak in Dharangaon area.esakal
Updated on

Jalgaon News : राम हे आपल्या सगळ्यांचे दैवत असून, आपल्या जीवन जगण्याची एक ऊर्जा आहे. रामामुळे आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षणाला महत्त्व प्राप्त झाले आहे.

कित्येक वर्षांचा संघर्ष आणि केलेल्या परिश्रमाला फळ म्हणून आज कारसेवकांचे योगदान व बलिदानातून प्रभू श्रीराम यांचे मंदिर प्रत्यक्षात साकारलेले आपण पाहत आहोत. (Guardian Minister Gulabrao Patil statement Construction of temple with contribution of Karsevak)

त्यामुळे कारसेवकांचा सन्मान हा निश्चित कौतुकास्पद असून, कारसेवकाना नतमस्तक होतो, असे प्रतिपादन पालकमंत्री तथा शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी केले.

ते बालाजी वहन व्यवस्थापक मंडळामार्फत ‘सन्मान कारसेवकांचा’ या कार्यक्रम प्रसंगी बोलत होते. राज्याचे समरस्त संघाचे उपाध्यक्ष प्रा. आर. एन. महाजन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

धरणगाव तालुक्यातील ६४ कारसेवकांचा सन्मान येथील बालाजी व्यवस्थापक मंडळामार्फत राम मंदिर ते राष्ट्र मंदिराची प्रतिकृती असलेली प्रतिमा, शाल व श्रीफळ देऊन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी कार सेवेत भाग घेणाऱ्या दिवंगत कारसेवकांना नमन करून आदरांजली अर्पण करण्यात आली. या वेळी संघाचे ज्येष्ठ पदाधिकारी धृवसिंग राजपूत यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Guardian Minister Gulabrao Patil with Karsevak in Dharangaon area.
Jalgaon News : बाळासाहेबांचे विचार विकास, संस्काराची शिदोरी : पालकमंत्री पाटील

बालाजी वहन व्यवस्थापक मंडळाचे अध्यक्ष डी. आर. पाटील यांनी प्रास्ताविकात ‘सन्मान कारसेवकांचा’ कार्यक्रमाबाबत सविस्तर माहिती विषद केली.

आर. डी. महाजन यांनी सूत्रसंचालन केले. सचिव प्रशांत वाणी यांनी आभार मानले. कार सेवा आंदोलनातील मी एक प्रत्यक्ष साक्षीदार आहे, असे सांगून अयोध्येत झालेल्या रक्तरंजित घटनेचा त्यांनी आखों देखा हाल प्रा. महाजन यांनी कथन केला.

कार्यक्रमाला शिवसेनेचे सह सचिव गुलाबराव वाघ, सचिव प्रशांत वाणी, कार्याध्यक्ष जीवनसिंग बयास, भानुदास विसावे, पप्पू भावे, विलास महाजन यांच्यासह शहरवासीय व परिसरातील पदाधिकारी, श्रीरामभक्त व कारसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Guardian Minister Gulabrao Patil with Karsevak in Dharangaon area.
Jalgaon News : जिल्हा बँकेतर्फे महावीर सोसायटीची इमारत जप्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.