Gulabrao Patil News : तालुक्यातील साकरे गावात आगीमुळे घर व मालमत्तांचे नुकसान झालेल्या चारही कुटुंबास शासनाच्या मोदी आवास योजनेतून घरकुल देण्यात येतील, अशी ग्वाही राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी गुरुवारी(ता. २१) येथे दिली.
शासन या पीडीत कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, असा विश्वासही पालकमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.(Guardian Minister Gulabrao Patil statement of Fire victims will be given shelter under scheme jalgaon news)
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज साकरे गावात भेट देत आग पीडित कुटुंबाची सांत्वनपर भेट घेतली. या वेळी पालकमंत्र्यांनी वैयक्तिक प्रत्येक कुटुंबाला दहा हजार रुपयांची मदत केली. तसेच प्रत्येकाला गॅस, शेगड्या, तीन महिन्यांचा किराणा, भांड्यांचा संच, गहू व तांदूळ, साड्या व वस्त्रांच्या रूपाने पालकमंत्र्यांनी या कुटुंबांना तत्काळ मदतीचा हात देत त्यांच्या दु:खावर फुंकर घातली.
पालकमंत्र्यांची भेट घेतल्यावर पीडित तिरुणाबाई पाटील यांना अश्रू अनावर झाले. या वेळी पालकमंत्र्यांनी त्यांना दिलासा दिला. या प्रसंगी पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधत पीडितांना आठ दिवसांच्या आत मोदी आवास योजनेतून घरकुल प्रस्ताव मंजूर करण्याचे निर्देश दिले. याप्रसंगी धरणगाव तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी उपस्थित होते.
साकरे गावात १८ डिसेंबरला रात्री एकच्या सुमारास चार घरांना भीषण आग लागल्याची घटना घडली होती. या आगीत रमेश वना पाटील, वना सुकदेव पाटील, स्वप्नील अमृतकर आणि तिरुणाबाई वना पाटील यांच्या घरातील कापूस, पैसे व ऐवज जळून खाक झाला असून लाखांचे नुकसान झाले. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पीडित कुटुंबाच्या आग लागलेल्या घरात प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली.
या वेळी साकरे गावातील सरपंच श्रीकांत पाटील, पोलिस पाटील घन:श्याम पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख नीलेश पाटील, महिला आघाडी संपर्कप्रमुख सरिता कोल्हे - माळी, तालुकाप्रमुख डी. ओ. पाटील, मार्केटचे माजी सभापती प्रमोद पाटील, मोतीआप्पा पाटील, जगतराव पाटील, नवल पाटील, आसोदेकर, तुषार महाजन, महिला आघाडी तालुकाप्रमुख पुष्पा पाटील, उपतालुकाप्रमुख रिया इंगळे, प्रियंका कोळी आदी उपस्थित होते. यावेळी मोठ्या संख्येने साकरे ग्रामस्थ, तरूण व महिला उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.