जळगाव : आमचे चाळीस रेडे गुवाहाटी येथे जात आहेत, अशा शेलक्या शब्दात राज्याचे पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांना टोला लगावला.
जिल्हा दूध संघाच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीनिमित्त भाजप-शिंदे गटाची बैठक शुक्रवारी (ता. २५) औद्योगीक वसाहतीतील हॉटेल मैत्रयमध्ये झाली. बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. पालकमंत्री पाटील म्हणाले, की गुवाहाटी येथे कामाख्या देवीच्या दर्शनासाठी जात आहेत.(Guardian Minister Gulabrao Patil Taunting Statement on Sanjay Raut Jalgaon Political News)
हेही वाचा : मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....
आमचे चाळीस रेडे जाणार आहेत, असा उल्लेख त्यांनी यावेळी केला. त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांना टोला लगावला. खासदार राऊत गुवाहाटी येथे जाणाऱ्या शिंदे गटाच्या आमदारांचा ‘रेडे’ असा उल्लेख करीत असतात.
मंत्री गुलाबराव पाटील यांनी आपण गुवाहाटी येथे जाणार नसल्याचे स्पष्ट केले. याबाबत ते म्हणाले, की जळगाव जिल्हा दूध संघाची निवडणुकीची माघार सोमवारी (ता. २८) आहे. त्यामुळे आपण येथेच थांबणार आहोत, तशी विनंतीही आपण मुख्यमंत्री शिंदे यांना केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.