Gulabrao Patil : सफाई कर्मचाऱ्यांचे प्रलंबित समावेशनबाबतीत राज्यस्तरावर धोरण निश्चित होत आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्फत लवकरात लवकर सफाई कामगारांचे प्रलंबित प्रश्नांना न्याय देण्याचे काम करण्यात येईल. (Guardian Minister Patil statement Pending demands of employees will be resolved jalgaon news)
७२ कर्मचाऱ्यांपैकी पहिल्या टप्प्यात २२ मंजूर असून, उर्वरित कर्मचाऱ्यांना लवकरच नियुक्तिपत्र मिळणार आहे. महिला सफाई कामगार व इतर कर्मचाऱ्यांना कुठल्याही प्रकारच्या अडीअडचणी येऊ देणार नाही, असे आश्वासन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी येथे दिले. नशिराबाद येथील नगर परिषद कार्यालयात आयोजित कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.
३० जून २०२१ ला नशिराबाद ग्रामपंचायतीचे नगर परिषदेमध्ये रूपांतर करण्यात आले. त्या वेळेस एकूण ८२ कर्मचारी कार्यरतपैकी दहा निवृत्त झाल्याने ७२ कर्मचाऱ्यांना नगर परिषदेत समाविष्ट करण्यासाठी पालकमंत्री पाटील यांच्या प्रयत्नाने पहिल्या टप्प्यात २२ कर्मचाऱ्यांना विभागीय आयुक्तांनी मंजुरी दिली होती.
या वेळी पालकमंत्री यांच्या हस्ते तत्कालीन ग्रामपंचायत २२ कर्मचाऱ्यांना नियुक्ती आदेश वाटप करण्यात आले. दुसऱ्या टप्प्यातील उर्वरित पात्र कर्मचाऱ्यांचे समावेशन डिसेंबरअखेर होईल.
मुख्याधिकारी रवींद्र सोनवणे, माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, सहाय्यक पोलिस निरीक्षक रामेश्वर मोताळे, माजी सरपंच विकास पाटील, पंकज महाजन, माजी सदस्य सत्तार पहेलवान, प्रकाश महाजन, शिवसेना शहरप्रमुख विकास धनगर, युवासेना शहरप्रमुख चेतन बऱ्हाटे, नशिराबाद शिक्षण मंडळाचे अध्यक्ष योगेश पाटील, विजय तोष्णीवाल, आझाद पटेल, सचिन पल्हाडे, पराग रुले, मनोज गोरे, चंदू भोळे, बरकत अली, भूषण कोल्हे आदी उपस्थित होते. मुख्याधिकारी सोनवणे यांनी प्रास्ताविक केले. पाचपांडे यांनी सूत्रसंचालन केले. रगडे यांनी आभार मानले.
...यांना दिले नियुक्तिपत्र
दीपक नाईक, संतोष रगडे, प्रवीण ढाके, गिरीश रोटे, अतुल चौधरी, आशिष बराटे, संतोष येवले, रतन सुरवाडे, बळिराम बोंडे, ज्ञानेश्वर चौधरी (सर्व लिपिक-टंकलेखक), विशाल कावळे (पंप ऑपरेटर), योगेश जावळे, उमाकांत झटके, ललित भोळे (सर्व शिपाई), विनोद चिरावंडे, अशोक जाधव, सागर लोखंडे, जयेश मर्दाने (सर्व मुकादम), सुनील पाटील (व्हॉल्वमन).
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.